शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार वीज ग्राहकांसाठी अभय योजना

By admin | Updated: October 6, 2016 01:32 IST

प्रत्येकाला विजेची गरज नित्याची झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे वीज पुरवठा आहे. मात्र अनेक ग्राहक वीज वापरतात.

थकबाकीमुक्त व्हा : १ नोव्हेंबरपासून करणार अंमलबजावणीराजकुमार चुनारकर चिमूरप्रत्येकाला विजेची गरज नित्याची झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे वीज पुरवठा आहे. मात्र अनेक ग्राहक वीज वापरतात. मात्र वीज बिलाचा भरणा करीत नाही. त्यामुळे महावितरणची वीज ग्राहकांकडे असलेली थकबाकी दिवसेंदिवस वाढतच असून हा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहचला आहे. ही थकबाकी वसूल व्हावी व ग्राहकांनाही थकबाकीतून मुक्ती मिळावी, या उद्देशाने महावितरणकडून थकीत वीज बिलामुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकासाठी अभय योजना राबविली जाणार आहे. या योजनेमुळे थकबाकीमुक्त होण्याची वीज ग्राहकांना संधी मिळणार आहे.या योजनेअंतर्गत थकबाकीदाराला व्याज व विलंब शुल्क माफ करण्यात येऊन केवळ मुद्दल रक्कम भरावी लागणार आहे. कृषी व पाणीपुरवठा योजना वगळता राज्यातील सर्वच प्रकारच्या थकबाकीदार वीज ग्राहकांसाठी असलेली ही योजना १ नोव्हेंबर २०१६ पासून सुरु होणार असून ती सहा महिन्यापर्यंत सुरु राहणार आहे.अनेक महिने वीज देयकांची रक्कम न भरल्यामुळे थकबाकीदार झालेल्या ग्राहकांची वीज जोडणी महावितरणने कापली आहे. राज्यात असे अनेक ग्राहक असून अशा ग्राहकांना आता पुन्हा एकदा ‘अभय’ योजने अंतर्गत मुख्य प्रवाहात सामावून घेवून त्याचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. राज्यातून एकूण ३८ लाख थकबाकीदार वीज ग्राहकांना अभय योजनेचा लाभ होऊ शकतो. याबाबत २७ सप्टेंबरला परिपत्रक जारी करण्यात आले आहे. परिपत्रकानुसार ३१ मार्च २०१६ पूर्वी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत झालेले ग्राहक या योजनेसाठी पात्र आहेत. या योजने अंतर्गत येत्या नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांच्या कालावधीत वीज ग्राहकांना मुद्दल रक्कम भरुन वीज पुरवठा पूर्ववत करता येणार आहे.