शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

८,४४० वाहनधारकांना विनाकारण फिरणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:01 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून अन्य वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र कोरोनाचे गांभीर्य नसलेले अनेकजण वाहनाद्वारे मुक्त संचार करीत आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करून शिस्त लावण्याचे काम वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या नेतृत्वात ८० कर्मचारी करीत आहेत.

ठळक मुद्देवाहतूक पोलिसांची कारवाई : ६६७ वाहने जप्त; मोजावी लागली १० लाखांवर दंडाची रक्कम

परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन असताना घराबाहेर पळू नये, अशा प्रशासनाच्या सूचना आहे. तरीही नियमांची पायमल्ली सुरू असल्याची बाब पोलिसांनी केलेल्या वाहनधारकांवरील कारवाईतून दिसून येते. वाहतुक नियंत्रण शाखेने २४ मार्च ते २९ एप्रिल या कालावधीत विशेष मोहीम राबविली. यामध्ये तब्बल ८ हजार ४४० वाहनांवर कारवाई केली असून दहा लाख ४३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आली आहे. यामध्ये ६६७ वाहने जप्त करण्यात आली आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून अन्य वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र कोरोनाचे गांभीर्य नसलेले अनेकजण वाहनाद्वारे मुक्त संचार करीत आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करून शिस्त लावण्याचे काम वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या नेतृत्वात ८० कर्मचारी करीत आहेत.लॉसकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी घराबाहेर पडण्यावर बंदी घातली आहे. तरीही काही वाहनधारक विनाकारण घराबाहे पडत आहे. अशांवर वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस नाकाबंदीदरम्यान कसून तपास करीत आहे. यामध्ये आतापर्यंत ८ हजार ४४० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर ६६७ वाहने जप्त करण्यात आली आहे.4034 अनपेड कारवाईवाहतूक पोलिसांनी महिनाभरात आठ हजार ४४० कारवाई केल्या. यामध्ये चार हजार ४०६ पेड कारवाईमध्ये दहा लाख ४३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. तर चार हजार ३४ अनपेड कारवाया करण्यात आल्या. या कारवाईतील दंड १५ दिवसांच्या आत भरण्याच्या सूचना वाहनचालकांना दिल्या आहेत. तर ६६७ वाहने जप्त केली आहेत.वाहनचालकांचे समुपदेशनकोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्याने लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे वाहनचालकांनी विनाकारण फिरू नये, घरीच राहावे, आरोग्याची काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अशा शब्दात वाहनचालकांना समुपदेशन करण्याचे काम वाहतूक पोलीस करीत आहेत.292 जमावबंदीच्या कारवायाकोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ (१) (३) अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केलेले आहेत. त्यानुसार कलम १८८ अन्वये आतापर्यंत २९२ कारवाया करण्यात आल्या असून त्यांच्याकडूनही दंड वसूल करण्यात आला आहे.कोरोनाचा धोका असल्याने कुणीही विनाकारण बाहेर निघू नये, असे प्रशासनाचे निर्देश आहे. मात्र अनेकजण उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे. अशा वाहन चालकिांविरोधात विशेष मोहिम सुरु केली आहे. त्यानुसार दंड आकारण्यात आला.- हृदयनारायण यादव, पोलीस निरीक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपूर

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस