शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गडचांदूरमध्ये एकाच रात्री आठ घरफोड्या

By admin | Updated: October 29, 2014 22:48 IST

दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधत गडचांदूरमध्ये चोरट्यांना हात साफ केले आहे. यामुळे दिवाळीच्या आनंदी वातावरणामध्ये विरजण पडले आहे. तब्बल आठ जणांच्या घरी एकाच रात्री

गडचांदूर : दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधत गडचांदूरमध्ये चोरट्यांना हात साफ केले आहे. यामुळे दिवाळीच्या आनंदी वातावरणामध्ये विरजण पडले आहे. तब्बल आठ जणांच्या घरी एकाच रात्री चोरी झाल्याची घटना गडचांदुरातील शिक्षक वसाहतीत घडली. त्यामुळेच एकच खळबळ उडाली आहे. यात नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला. हे कळू शकले नाही. या चोऱ्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी प्रत्येकजण बाहेरगावी जाण्याचा बेत आखत असतो. यंदा शाळकरी विद्यार्थ्यांसोबत सरकारी कर्मचाऱ्यांना चार दिवसांची सुट्टी मिळाली. बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. गडचांदूर येथील शिक्षक वसाहतीतील रमेश दरेकर, विजय राठोड, रामप्रभू नागे, उत्तम जाधव, गायकवाड, गौतम व बोढे यांचे किरायदार असे एकूण आठ जण दिवाळीनिमित्त बाहेरगावी आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. त्यामुळे या घरांना मागील काही दिवसांपासून कुलूप लागलेले होते. कुलूपबंद घरांवर अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी आपला डाव साधला. या आठही नागरिकांच्या घरी एकाच रात्री चोरी करुन अज्ञात चोरटे पसार झाले. मंगळवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यातील अनेक नागरिक बाहेरगावी असल्यामुळे त्यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधू चोरीची माहिती देण्यात आली. पोलीस तपास सुरु असल्याने नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला याची माहिती मिळाली नाही. एकाच रात्री आठ घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भिती व्यक्त केली जात असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नगारिकांनी केली आहे. याप्रकरणी पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे. औद्योगिक वसाहत असल्याने बाहेरराज्यातून मोठ्या संख्येने येथे नागरिक वास्तव्यास आहे. सणानिमित्त ते बाहेरगावी गेल्याची संधी चोरट्यांनी साधली. (शहर प्रतिनिधी)