शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामात वाटणार ६८८ लाखांचे पीक कर्ज

By admin | Updated: May 30, 2015 01:39 IST

खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून जिल्हा प्रशासनाने यावर्षी ६८८ लाख ८५ हजार रूपयाचे पीक कर्ज वाटपाचे नियोजन केले आहे.

मंगेश भांडेकर चंद्रपूरखरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून जिल्हा प्रशासनाने यावर्षी ६८८ लाख ८५ हजार रूपयाचे पीक कर्ज वाटपाचे नियोजन केले आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यात कर्ज वाटपाचा श्रीगणेशा झाला नसल्याने शेतकऱ्यांना खरीप पीक पेरणीसाठी अडचणी येण्याची शक्यता बळावली आहे. २५ मे पासून रोहिणी नक्षत्राला सुरूवात झाली असून ८ जूनला मृग नक्षत्र लागणार आहे. सर्वसाधारणपणे मृग नक्षत्रापासूनच पाऊस पडायला सुरूवात होत असते. त्यामुळे या नक्षत्रात पेरणीच्या कामांना वेग येते. आता शेतकरी मान्सूनपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असून पेरणीसाठी बी-बियाण्यांची जुळवाजुळव करीत आहेत. मात्र गेल्या दोन वर्षातील ओला व कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी आर्थिक तंगीत आहे. अशात त्यांना बी-बियाणे खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणी येत असून बँक, सावकार, नातेवाई यांच्याकडे कर्जासाठी धावपळ करीत असल्याचे चित्र आहे. बँकांकडून कर्ज वाटपाचा लवकर श्रीगणेशा होऊन शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळाल्यास बी-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी जास्त अडचणींचा सामना करावा लागणार नाही. मात्र बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांना नाममात्र कर्ज देऊन कर्ज वाटपाचा श्रीगणेशा केल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे. प्रत्यक्षात मात्र स्थिती वेगळीच असून अनेकांनी कर्जासाठी अर्ज करूनही त्यांच्या प्रकरणांवर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे कर्ज मिळण्यास आणखी किती दिवसांचा कालावधी लागेल, याची चौकशी शेतकरी करीत आहेत. कृषी विभागाने खरीप पीक पेरणी अहवाल तयार करून विविध बँकामार्फत कर्ज वाटपाचे उद्दीष्ठ निश्चीत केले असले तरी अनेक शेतकऱ्यांना कर्जासाठी हेलपाट्या मारावे लागत असल्याची स्थिती आहे. सातबारावरील हिस्सेदारांची सहमती, यापूर्वीच्या कर्जाचा बोजा, कर्ज नसल्याचा दाखला अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर येत आहेत. त्यामुळे काही शेतकरी बँकेच्या कर्जापेक्षा नातेवाईक किंवा सावकार यांच्याकडून मिळणारे कर्ज लवकर मिळत असल्याने त्यांच्याकडे वळले असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. नियोजनापेक्षा अधिक कर्ज वाटप जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी कर्ज वाटपाचे नियोजन केले जाते. मात्र दरवर्षीच नियोजनापेक्षा अधिक कर्जाचे वाटप झाले आहे. २०१२-१३ मध्ये ३८० लाख ८८ हजार रूपयाचे कर्ज वाटपाचे नियोजन होते. यात ४०८ लाख ३४ हजार रूपयाचे कर्ज वाटप झाले. २०१३-१४ मध्ये ४६८ लाख ३२ हजार रूपयाचे कर्ज वाटप नियोजन होते. यात ५५९ लाख ८८ हजार रूपयांचे कर्ज वाटप झाले. तर सन २०१४-१५ मध्ये ५५९ लाख ८८ हजार रूपयांचे कर्ज वाटप नियोजन होते. यात ५९९ लाखांचे कर्ज वाटप झाले.जिल्हा मध्यवर्ती बँकेची आघाडीदरवर्षी कर्ज वाटप प्रकरणात जिल्हा मध्यवर्ती बँकेची आघाडी राहिली आहे. २०१२-१३ या वर्षात जिल्हा मध्यवर्ती बँकेने २०६ लाख ५६ हजार रूपयाचे कर्ज वाटप केले. २०१३-१४ मध्ये २२६ लाख ७९ हजार तर २०१४-१५ मध्ये ३६१ लाख २१ हजार रूपयाचे कर्ज वाटप केले आहे. २०१५-१६ या वर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून ३९३ लाखांचे कर्ज वाटपाचे नियोजन आहे.