शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगबंदीच्या स्थितीमुळे ५०० कोटींची गुंतवणूक ठप्प

By admin | Updated: December 23, 2014 23:00 IST

जिल्ह्यातील आणि चंद्रपूर परिसरातील उद्योगधंदे बंद पडण्याच्या स्थितीमुळे ५०० कोटी रूपयांची गुंतवणूक ठप्प पडली आहे. एवढेच नाही तर, एमआयडीसी क्षेत्रातील चार स्पंज आयर्न प्लँटही बंद पडले आहेत.

चंद्रपूर : जिल्ह्यातील आणि चंद्रपूर परिसरातील उद्योगधंदे बंद पडण्याच्या स्थितीमुळे ५०० कोटी रूपयांची गुंतवणूक ठप्प पडली आहे. एवढेच नाही तर, एमआयडीसी क्षेत्रातील चार स्पंज आयर्न प्लँटही बंद पडले आहेत. उद्योगांना या स्थितीतून बाहेर काढण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील उद्योजकांनी अलिकडेच उद्योगमंत्र्यांची भेट घेऊन सहकार्याची विनंती केली. यातून काय मार्ग निघतो, याकडे आता उद्योजकांचे लक्ष लागले आहे.गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लोह आहे. त्याची चाचणी करण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे. हे क्षेत्र नक्षलग्रस्तभागात येत असल्याने व्यावसायिकांना अडचणीचे ठरत आहे. खनिज संपत्ती उपलब्ध असतानाही त्याचा वापर करता येत नसल्याने यासंदर्भात सरकारने निर्णय घेण्याची विनंती उद्योजकांकडून होत आहे. केंद्रीय पर्यावरण विभागाने २०१० पासून चंद्रपूर जिल्ह्यात उद्योगबंदी घातली आहे. यामुळे नव्या उद्योगांचा मार्ग बंद झाला आहे. अनेक गुंतरवणूकदार आणि उद्योजक या जिल्ह्यात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आतूर असले तरी बंदी हटविण्याच्या मागणीवर निर्णय झाला नाही.अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीज दर अधिक असल्याची उद्योजकांची ओरड आहे. याचा प्रतिकूल परिणाम स्टिल आणि प्लॉस्टीक उद्योगावर पडत असल्याने स्पर्धेत हे उद्योजक टिकू शकत नाही, असे उद्योजकांचे मत आहे.कोळसा हा उद्योगांमध्ये महत्वाचा असला तरी आॅक्शनमध्ये तो खरेदी करावा लागत असल्याने दर अधिक पडतो. यामुळे विजेच्या उत्पादन दरातही वाढ होते. अधिक दराची वीज खरेदी करण्यास सरकार आणि अन्य उद्योगसमूह तयार नसल्याने हा खर्च कसा पेलवायचा असा प्रश्न उद्योजकांकडून उपस्थित केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)