२१ तासात ४५ कोरोना रूग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:33 IST2021-01-08T05:33:44+5:302021-01-08T05:33:44+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार ४६६ वर पोहोचली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २१ हजार ७३७ ...

45 corona patients were found in 21 hours | २१ तासात ४५ कोरोना रूग्ण आढळले

२१ तासात ४५ कोरोना रूग्ण आढळले

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार ४६६ वर पोहोचली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २१ हजार ७३७ झाली आहे. सध्या ३५६ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८० हजार १७८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली त्यापैकी एक लाख ५५ हजार ९८ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये भद्रावती शहरातील ७५ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३७३ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील ३३९, तेलंगणा व बुलडाणा प्रत्येकी एक, गडचिरोली १८, यवतमाळ ११, भंडारा एक व वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधित आलेल्या ४५ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील १९, चंद्रपूर तालूका चार, बल्लारपुर सहा, भद्रावती चार, सिंदेवाही एक, राजूरा एक, चिमुर चार, वरोरा चार, कोरपना एक व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे. कोरोना आजार अद्याप गेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: 45 corona patients were found in 21 hours