३५ हेक्टर जंगल जळाले

By Admin | Updated: April 17, 2016 00:43 IST2016-04-17T00:43:15+5:302016-04-17T00:43:15+5:30

मागील काही दिवसात वरोरा वनपरिक्षेत्रातील टेमुर्डा उपवनक्षेत्रातील जंगलात आग लागली होती.

35 hectare jungle burnt | ३५ हेक्टर जंगल जळाले

३५ हेक्टर जंगल जळाले

सालोरी मेसा जंगलातील घटना : वन्यप्राण्यांचे इतरत्र स्थलांतरण
वरोरा : मागील काही दिवसात वरोरा वनपरिक्षेत्रातील टेमुर्डा उपवनक्षेत्रातील जंगलात आग लागली होती. त्यानंतर वरोरा वनपरिक्षेत्रातील सालोरी मेसा गावानजीकच्या ३५ हेक्टर जंगलात आग लागल्याने वनविभागाचे मोठ्या प्रमाणाम नुकसान झाले आहे. जंगलातील आगीमुळे वन्यप्राण्यांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतरण करणे सुरू केल्याने वन्यप्राणी जंगला नजीकच्या गावात शिरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वरोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वरोरा चिमूर मार्गा लगतच्या सालोरी जंगलातील कक्ष क्रमांक १२ मध्ये १५ एप्रिलच्या पहाटे आग लागली. पहाटेची घटना असल्यामुळे ही आग वाढत कक्ष क्रमांक ९२७ मेसापर्यंत पोहचली. आग लागल्याची माहिती वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी सकाळीच घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आगीने जंगलातील ३५ हेक्टर परिसर वेढून घेतला होता. आग विझविण्यासाठी वन अधिकारी व कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करू लागले. परंतु आग आटोक्यात येत नसल्याने वरोरा नगरपालिकेच्या अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्नीशामक दलाच्या जवानांनी वरोरा चिमूर मार्गा लगतच्या जंगलातील आग विझविली. परंतु अग्नीशामक दलाचे वाहन जंगलात जात नसल्याने अग्नीशामक दलाचे प्रयत्न जंगलातील आग विझविण्यास निरर्थक ठरले. आगीमध्ये रोपवाटिकेतील रोपांना झळ पोहचली असून जंगलातील गावात व काही झाडेही आगीमध्ये सापडल्याने आगीमुळे वनविभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे मानले जात आहे. जंगलात वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असताना वनविभागाकडे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे साहित्य अपुरे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे घटनास्थळावर वनअधिकारी व कर्मचारी पोहचूनही आगीपासून जंगलाचा बचाव करता येत नसल्याचे या घटनेवरून दिसून आले. सालोरी मेसा जंगलातील आग तब्बल आठ तासानंतर आटोक्यात आली. (तालुका प्रतिनिधी)

प्रति आग असफल
आग जंगलात पसरत जावू नये, त्यामुळे आग लागल्याच्या ठिकाणापासून काही अंतरावर प्रति आग लावली जाते. या प्रति आगीवर वनविभागाचे कर्मचारी आग वाढू नये म्हणून नियंत्रण ठेवून असतात. परंतु मेसा सालरी जंगलात आग लागल्यानंतर वनविभागाच्या अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी प्रति आग लावली. त्यावेळी जोरदार वारा असल्याने प्रति आग यशस्वी ठरली नाही.

वन्यप्राण्यांचे स्थलांतरण
सालोरी मेसा परिसरात एक वाघीण आपल्या तीन पिल्यासह वास्तव्यास आहे. वाघीण व पिल्लाचे दर्शन रस्ता ओलांडतांना अनेकांनी यापूर्वी घेतले आहे. यासोबत सालोरी परिसरात अनेकांनी पिल्लासह वाघिणीचे दर्शन घेतले. असे असताना याच परिसरात आग लागल्याने वाघीण व तिचे बछडे व अनेक वन्यप्राणी स्थलांतरीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वन्यप्राणी जंगलानजीकच्या गावात येण्याची भीती ग्रामस्थ बाळगून आहे.

घटनेच्या दिवशी याच परिसरात रात्री दहा वाजेपर्यंत गस्त केली. तेव्हा आग दिसून आली नाही. ही आग पहाटे लागण्याची शक्यता असून आगीचे कारण शोधणे सुरू आहे. यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करू.
- किशोर देऊळकर
वनपरिमंडळ अधिकरी शेगाव (बु)

Web Title: 35 hectare jungle burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.