शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर तालुक्यात ३२ ठिकाणचे पाणी दूषित

By admin | Updated: June 24, 2015 01:30 IST

पावसाळा सुरू झाला. जलजन्य आजारापासून वाचविण्यासाठी पाणी व स्वच्छता विभाग जनजागृती मोहीम राबविण्याचा संकल्प करीत आहे.

अनेकश्वर मेश्राम  बल्लारपूरपावसाळा सुरू झाला. जलजन्य आजारापासून वाचविण्यासाठी पाणी व स्वच्छता विभाग जनजागृती मोहीम राबविण्याचा संकल्प करीत आहे. मात्र दूषित पाण्याच्या स्त्रोतांकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून आजघडीला नागरिकांना फ्लोराईड युक्त पाणी पिण्याची पाळी आली आहे. आरोग्य विभागाने कोणतीही उपाय योजना न केल्यामुळे बल्लारपूर तालुक्यातील तब्बल ३२ ठिकाणचे पाणी दूषित असल्याचे वास्तव समोर आले आहे. याच पाण्याचा वापर नागरिक करीत आहेत.जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने अलीकडे साथरोगमुक्त पाणी गुणवत्ता जनजागृती अभियान सुरू केले. ‘शुद्ध पाण्याचा वापर, साथ रोगास ठेवील दूरवर’ हे घोषवाक्य आहे. यासाठी तीन टप्प्याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र सदर कार्यक्रम कागदापुरताच सिमीत असल्याचे दिसून येत आहे. ज्या ठिकाणचे पाणी दूषित आहे, त्या ठिकाणी नागरिकांच्या सोईसाठी फलक लावणे गरजेचे असताना संबंधित विभाग त्याकडे डोळेझाक करीत आहे. परिणामी त्या परिसरातील नागरिकांना नाईलाजास्तव दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे.आरोग्य विभागाच्या अहवालानुसार बल्लारपूर तालुक्यात सहा विहिरी व २६ हातपंपाचे पाणी फ्लोराईड युक्त असून पिण्यास अयोग्य असल्याचे म्हटले आहे. सदर गावागावातील जलस्त्रोत शुद्धीकरण प्रक्रिया करुन पाणी पुरवठा करणे क्रमप्राप्त अहे. जेव्हापर्यंत शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जात नाही, तेव्हापर्यंत सूचना फलक लावणे आवश्यक असताना, त्याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण आरोग्य विभागाने अवलंबले आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य दूषित पाण्यामुळे धोक्यात आले आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचेही याकडे लक्ष नाही.पावसाळ्याच्या दिवसात उद्भवणाऱ्या जलजन्य साथ रोगांवर नियंत्रणासाठी उपाय योजना करण्यासंदर्भात प्रशासन गवगवा करते. साथ रोगांचा प्रादूर्भाव रोखण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आव आणत असले तरी नियोजन शुन्य कारभारामुळे जलस्त्रोताचे शुद्धीकरण प्रक्रिया केली जात नसल्याचे दिसून येते. केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कागदोपत्री अहवाल सादर करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला जात आहे. पिण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाण्याचा नियमीतपणे पुरवठा करण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना संबंधित विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.