जिल्ह्यातील ३० टक्के बसेस अद्यापही आगारातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 05:00 IST2021-06-25T05:00:00+5:302021-06-25T05:00:31+5:30

चंद्रपूर विभागाअंतर्गत चंद्रपूर, वरोरा, चिमूर आणि राजुरा हे आगार येतात. या आगारातून ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत बसेस चालविल्या जातात. मात्र, लाॅकडाऊन झाल्यानंतर बस बंद करण्यात आल्या. कोरोना रुग्ण कमी झाल्यानंतर नागपूर तसेच लांब पल्ल्याच्या अन्य बसेस सुरू करण्यात आल्या. मात्र, आजही ग्रामीण भागात एसटी पोहोचली नसून येथील नागरिकांनी काळीपिवळी, ऑटो तसेच दुचाकीने शहरात यावे लागत आहे. यामध्ये त्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. 

30% buses in the district are still in depots | जिल्ह्यातील ३० टक्के बसेस अद्यापही आगारातच

जिल्ह्यातील ३० टक्के बसेस अद्यापही आगारातच

ठळक मुद्देप्रवाशांना काळीपिवळीचा आधार : सुरक्षित प्रवासापासून ग्रामीण नागरिक दुरच

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. त्यानंतर बससेवासुद्धा बंद करण्यात आली होती. सद्यस्थितीत अनलाॅक झाले असले तरी ७० टक्केच बस रस्त्याने धावत आहेत. परिणामी ग्रामीण प्रवाशांना  त्रास सहन करावा लागत असून त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
चंद्रपूर विभागाअंतर्गत चंद्रपूर, वरोरा, चिमूर आणि राजुरा हे आगार येतात. या आगारातून ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत बसेस चालविल्या जातात. मात्र, लाॅकडाऊन झाल्यानंतर बस बंद करण्यात आल्या. कोरोना रुग्ण कमी झाल्यानंतर नागपूर तसेच लांब पल्ल्याच्या अन्य बसेस सुरू करण्यात आल्या. मात्र, आजही ग्रामीण भागात एसटी पोहोचली नसून येथील नागरिकांनी काळीपिवळी, ऑटो तसेच दुचाकीने शहरात यावे लागत आहे. यामध्ये त्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. 
चंद्रपूर विभागामध्ये २४५ बसेस असून, १ हजार ५०५ कर्मचारी आहे. मात्र, सद्यस्थितीत ७० टक्केच बसेस चालविल्या जात आहेत.बंद असलेल्या फेऱ्या सुरु करण्याची मागणी आहे.

या गावांना बस कधी
nराजुरा तालुक्यातील गोवरी, मानोली, बाबापूर, कढोली, साखरी, पवनी, मार्डा आदी, कोरपना तालुक्यात मांगलहिरा, येरगवान, कोडशी, चंद्रपूर-कोरपना (भोयेगाव मार्गे), जिवती तालुक्यातील गडचांदूर-जिवती येलापूर ही बस बंद आहे.
nराजुरा-गडचांदूर-शेणगाव, भारी, बाबापूर, राजुरा- पुडियाल मोहदा, राजुरा-गडचांदूर, शेणगाव-टेकामांडवा, नागभीड तालुक्यात नागभीड-बाळापूर, नागभीड मौशी आदी बस फेऱ्या बंद आहे.

प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार

चंद्रपूर जिल्ह्याची औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख आहे. त्यामुळे रोजगारासाठी इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने येथे नागरिक येतात. मात्र लाॅकडाऊननंतर बऱ्याच गावातील बस अद्यापही बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. विशेषत: नागपूर तसेच इतर काही मोठ्या शहरांसाठी ट्रॅव्हर्स आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना जाण्यासाठी काळीपिवळी, ग्रामीण ऑटोचांच आधार आहे.

काय म्हणतात प्रवास करणारे

लाॅकडाऊननंतर अनेक गावातील बसफेऱ्या बंद आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिकांना शहरात येण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामध्ये अतिरिक्त पैसा मोजावा लागत असून प्रवास करणे कठीण झाले आहे.
विजय ठाकरे, प्रवासी

लाॅकडऊनमुळे बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. आजही अनेक गावातील बस सुरु झाल्या नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसह कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महामंडळाने पूर्वीप्रमाणे सर्व बसफेऱ्या सुरु कराव्या.
- रमेश कोडापे, प्रवासी

Web Title: 30% buses in the district are still in depots