२४ तासांत २७ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST2021-02-05T07:42:32+5:302021-02-05T07:42:32+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार ९८४ वर पोहोचली आहे, तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ...

27 corona free in 24 hours | २४ तासांत २७ कोरोनामुक्त

२४ तासांत २७ कोरोनामुक्त

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार ९८४ वर पोहोचली आहे, तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ४३७ झाली आहे. सध्या १६१ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ९५ हजार ८७५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी एक लाख ७० हजार २२७ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ३८६ बाधितांचे मृत्यू झाले असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३४९, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १४, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधित आलेल्या २५ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील नऊ, बल्लारपूर दोन, भद्रावती दोन, ब्रह्मपुरी तीन, नागभीड दोन, सिंदेवाही एक, वरोरा तीन, कोरपना येथील तीन रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून अद्यापही आढळून येत आहेत. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे, तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: 27 corona free in 24 hours