शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

२५१ नवे रूग्ण, सहा कोरोना बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 05:00 IST

मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये दुर्गा माता मंदिर परिसर, जटपुरा गेट चंद्र्रपूर येथील ८२ वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. बाधिताला १० सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने मंगळवारी मृत्यू झाला. दुसरा मृत्यू आरटीओ ऑफिस परिसर, चंद्रपूर येथील ५२ वर्षीय पुरूषाचा झाला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ६,३०९ पॉझिटिव्ह : उपचारानंतर ३,५३८ निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासात २५१ नवीन बाधित आढळल्याने कोरोना पॉझिटिव्हची संख्या ६ हजार ३०९ झाली तर सहा बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ हजार ५३८ बाधित बरे झाले. २ हजार ६८७ व्यक्ती उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८४ बाधितांचा मृत्यू झाला. यापैकी जिल्ह्यातील ७७, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली दोन, यवतमाळ तीन बाधितांचा समावेश आहे.मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये दुर्गा माता मंदिर परिसर, जटपुरा गेट चंद्र्रपूर येथील ८२ वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. बाधिताला १० सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने मंगळवारी मृत्यू झाला. दुसरा मृत्यू आरटीओ ऑफिस परिसर, चंद्रपूर येथील ५२ वर्षीय पुरूषाचा झाला आहे. तिसरा मृत्यू कन्हाळगाव ब्रह्मपुरी येथील पुरूष, चौथा मृत्यू घुटकाळा वार्ड चंद्रपूर येथील ५० वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. चंद्रपूर शहरातील भानापेठ येथील ६९ वर्षीय पुरुष बाधिताचाही मृत्यू झाला. बाधिताला कोरोनासह न्युमोनिया, उच्च रक्तदाब, मधुमेह आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू होता.सहावा मृत्यू गांधी वार्ड, ब्रह्मपुरी येथील ५२ वर्षीय पुरूष बाधिताचा झाला आहे. बाधिताला १२ सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती केले होते. या बाधितालाही न्युमोनियाचा आजार झाला होता, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.तालुकानिहाय रूग्णचंद्रपूर शहर व परिसरातील १०१, कोरपना तालुका १, गोंडपिपरी ७, चिमूर ८, नागभीड ४, पोंभुर्णा ९, बल्लारपूर १८, ब्रह्मपुरी २८, भद्रावती ६, मूल तालुका ७, राजुरा ९, वरोरा तालुका १५, सावली २०, सिंदेवाही तालुका १४, वणी-यवतमाळ २, लाखांदूर-भंडारा व वडसा-गडचिरोली येथील प्रत्येकी एक असे एकूण २५१ कोरोना बाधित पुढे आले आहे.माजी आमदार व नगराध्यक्ष बाधितराजुरा : राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर व नगराध्यक्ष अरूण धोटे हे कोरोना बाधित झाले. शहरात कोरोनाने शिरकाव केल्याने १६ सप्टेंबर ते २० सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. या कालावधित रूग्णालये, अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर निघू नये, असे आवाहन तहसीलदार डॉ. होळी यांनी केले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या