शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील २१ वर्गखोल्या धोकादायक

By admin | Updated: July 17, 2017 00:40 IST

नागभीड तालुक्यातील जि.प. च्या १६ शाळांमधील २१ वर्गखोल्यांची स्थिती अतिशय धोकादायक असून या वर्गखोल्या

उपाययोजनेची गरज : गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अहवालानंतरही कार्यवाही नाहीघनश्याम नवघडे। लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड तालुक्यातील जि.प. च्या १६ शाळांमधील २१ वर्गखोल्यांची स्थिती अतिशय धोकादायक असून या वर्गखोल्या विद्यार्थ्यांना बसण्यायोग्य राहिल्या नाहीत, अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.एकीकडे शासन स्तरावर संपूर्ण शाळा डिजीटल करण्याची मोहीम सुरू असून त्याचवेळी या शाळा मोडकळीस निघाल्या आहेत. या शाळा अद्यावत करून द्या किंवा नवीन वर्गखोल्या उपलब्ध करून द्या, अशी स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती किंवा ग्रामपंचायतीकडून मागणी होत असली तरी या मागणीकडे लक्ष द्यायला प्रशासनाला वेळ नाही, हेच यावरुन सिद्ध होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जि.प. शाळा भिकेश्वर, जि.प. शाळा धामनगाव (चक), जि.प. शाळा विलम, जि.प. शाळा म्हसली, जि.प. शाळा पाहार्णी, जि.प. शाळा किटाळी, जि.प. शाळा चारगाव (माल), जि.प. उच्च प्राथमिक शाळा नागभीड, जि.प. प्राथमिक शाळा (मुलांची) तळोधी, जि.प. प्राथमिक शाळा (मुलींची) तळोधी, जि.प. प्राथमिक शाळा बाळापूर (बुज), आणि जि.प. प्राथमिक शाळा कोटेगाव या शाळामधील प्रत्येक एक वर्गखोली मोडकडीस आली आहे.जि.प. प्राथमिक शाळेच्या ३ वर्गखोल्या धोकादायक आहेत. जि.प. शाळा मेंढा, जि.प. शाळा मिंथूर आणि जि.प. शाळा बाम्हणी येथील प्रत्येकी २ वर्गखोल्या धोकादायक असल्याची माहिती आहे. येथील शिक्षण विभागाने वरिष्ठांना या संदर्भात माहिती दिल्याचे कळते. इमारत धोकादायक असून विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही, असा शेरासुद्धा येथील गटशिक्षणाधिकारी यांनी वरिष्ठांना दिलेल्या माहितीत दिला आहे. अनुचित घटना घडण्यापूर्वीच यावर उपाययोजना गरजेची आहे.