शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

पिलांच्या शोधात २०० वनकर्मचारी तैनात

By admin | Updated: September 12, 2016 00:41 IST

मृतावस्थेत आढळलेल्या वाघिणीच्या पिलांचा शोध घेण्यासाठी वनविभागाने २०० कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला आहे.

अद्याप शोध नाही : वाघिणीच्या मृत्यूूनंतर परिस्थितीनागभीड/तळोधी (बा.) : मृतावस्थेत आढळलेल्या वाघिणीच्या पिलांचा शोध घेण्यासाठी वनविभागाने २०० कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला आहे. असे असले या फौजफाट्याला या पिलांचा अद्यापही शोध घेता आला नाही, हे वन विभाग कितीही नाकारत असले तरी हे सत्य आहे.३ सप्टेंबरच्या संध्याकाळी मिंडाळा कक्ष क्र. ७३ अंतर्गत सावंगी जंगलात वाघीण मृतावस्थेत आढळली. एप्रिल महिन्यात वाघाचे तीन पिल्ले त्याच परिसरात अगदी उघड्यावर खेळताना अनेकांनी पाहिले होते. एवढेच नाही तर त्या बछड्यांची आई त्या बछड्यांजवळ येईपर्यंत वन विभागाने त्यांना संरक्षणही दिले होते. आता त्याच परिसरात वाघीण मृतावस्थेत आढळली. त्यावरून ती वाघीण त्या पिल्लांचीच आई असावी, यावर सर्वांचेच एकमत आहे. ती पिल्ले अद्यापही कोणाच्या दृष्टीपथास पडले नाहीत. म्हणूनच वन विभागाने त्यांचा शोध घेण्यासाठी वन विकास महामंडळ आणि वन विभाग या दोन्ही विभागाकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यासाठी दोन्ही विभागाचे मिळून वनपरिक्षेत्र अधिकारी दर्जाचे १५ अधिकारी, क्षेत्र सहायक दर्जाचे ५० अधिकारी, ५० वनरक्षक आणि ६० ते ७० वनमजूर तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून हे पथक या पिल्लांचा शोध घेत आहेत. त्यापैकी कोणतेही पिलू अद्यापही अधिकाऱ्याच्या दृष्टीस पडले नाही, हे निर्विवाद सत्य आहे. जर ही पिल्ले दिसली असती तर वन विभागाने या त्यांना ताब्यात घेऊन शोधमोहीम थांबविली असती, असे अनेकांचे म्हणणे आहे. (लोकमत चमू)पिल्ले दिसल्याचा दावावन विभाग गेल्या चार-पाच दिवसांपासून वाघिणीपासून विभक्त झालेल्या या पिलांंचा शोध २०० कर्मचारी त्यांचा शोध घेत असले तरी त्यांचा माग लागलेला नाही. त्यामुळे ही पिल्ले गेली कोठे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शोध घेणाऱ्या एका वनरक्षकाला व वनमजुराला ही पिल्ले दिसली. पण ते लगेच झुडुपाआड गेल्याने शहानिशा करू शकले नाहीत. नीलजई परिसरात वाघघुग्घुस : वेकोलिच्या नीलजई कोळसा खाण परिसरातील नीलजई-तरोडा गाव परिसरात शनिवारी वाघाने एका रोहीची शिकार केली. त्यामुळे वाघाचे वास्तव्य असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्या परिसरातून वेकोली कामगाराचे रात्रंदिवस रहदारी असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाकडून पिंजरा ठेवण्याची कारवाई सुरू असल्याचे कळते.