पोंभुर्णा येथे २० ऑक्‍सिजन बेड्स उपलब्‍ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST2021-04-25T04:28:09+5:302021-04-25T04:28:09+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या दृष्टीने जिल्‍हा रुग्‍णालयाला १७ व्‍हेंटिलेटर उपलब्‍ध करून देण्‍यापाठोपाठ माजी अर्थमंत्री आ. सुधीर ...

20 oxygen beds will be available at Pombhurna | पोंभुर्णा येथे २० ऑक्‍सिजन बेड्स उपलब्‍ध होणार

पोंभुर्णा येथे २० ऑक्‍सिजन बेड्स उपलब्‍ध होणार

चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या दृष्टीने जिल्‍हा रुग्‍णालयाला १७ व्‍हेंटिलेटर उपलब्‍ध करून देण्‍यापाठोपाठ माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्‍णालयात स्‍थापित झालेल्‍या कोविड केअर सेंटरला २० ऑक्‍सिजन बेड्स उपलब्‍ध होणार आहेत, अशी माहिती माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

जिल्‍हाधिकारी यांनी सदर ऑक्‍सिजन बेड्सच्या खरेदीसाठी १९ लक्ष रुपयांच्‍या खर्चाला २२ जानेवारी रोजी प्रशासकीय मान्‍यता प्रदान केली आहे. पोंभुर्णा येथील कोविड केअर सेंटरला २० ऑक्‍सिजन बेड्स उपलब्‍ध करण्‍याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिकाऱ्यांकडे केली व त्‍याचा पाठपुरावा केला. जिल्‍हा वार्षिक योजनेअंतर्गत सदर २० ऑक्‍सिजन बेड्सच्या खरेदीसाठी मंजुरी देण्‍यात आली आहे. पोंभुर्णा येथे ग्रामीण रुग्‍णालयाची इमारत बांधून तयार आहे. ही इमारत आवश्‍यक बाबींची पूर्तता करून आरोग्‍य सेवेसाठी जनतेच्‍या सेवेत रुजू करण्‍याबाबत आ. मुनगंटीवार यांचा पाठपुरावा सुरू आहे. नुकतीच त्‍यांनी जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सकांशी ऑनलाईन बैठकही घेतली. पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्‍णालयात १०० बेडेड कोविड केअर सेंटरसुध्‍दा त्‍यांच्‍या प्रयत्‍नांच्‍या फलस्‍वरूप सुरू करण्‍यात आले आहे.

या आदिवासीबहुल भागातील कोरोनाग्रस्‍त रुग्‍णांना ऑक्‍सिजन बेडची सुविधा उपलब्‍ध व्‍हावी म्‍हणून आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत २० ऑक्‍सिजन बेड्सला मंजुरी मिळविल्‍याने या भागातील नागरिकांना मोठी सोय उपलब्‍ध होणार आहे. सदर ऑक्‍सिजन बेड्स चार ते पाच दिवसांत रुग्‍णांच्‍या सेवेत रुजू होणार आहेत.

Web Title: 20 oxygen beds will be available at Pombhurna