१७२ नवे रूग्ण आढळले, १६९ कोराेनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 05:00 AM2020-12-04T05:00:00+5:302020-12-04T05:00:24+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २० हजार ४५५ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १८ हजार २३५ झाली आहे. सध्या एक हजार ९१० बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत एक लाख ५३ हजार ९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ३० हजार २८१ नमुने निगेटिव्ह आले आहेत.  आज मृत झालेल्या बाधितांमध्ये वरोरा तालुक्यातील मदेली येथील ६९ वर्षीय महिला व चंद्रपूर शहराच्या इंदिरानगर भागातील ५८ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

172 new patients found, 169 free | १७२ नवे रूग्ण आढळले, १६९ कोराेनामुक्त

१७२ नवे रूग्ण आढळले, १६९ कोराेनामुक्त

Next
ठळक मुद्देदोघांचा मृत्यू : १९१० जणांवर उपचार सुरू

  लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात १६९ जणांनी कोरोनावर मात केल्याने रूग्णालयातून सुटी देण्यात आली. १७२ नवीन बाधितांची  भर पडली तर दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २० हजार ४५५ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १८ हजार २३५ झाली आहे. सध्या एक हजार ९१० बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत एक लाख ५३ हजार ९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ३० हजार २८१ नमुने निगेटिव्ह आले आहेत.  आज मृत झालेल्या बाधितांमध्ये वरोरा तालुक्यातील मदेली येथील ६९ वर्षीय महिला व चंद्रपूर शहराच्या इंदिरानगर भागातील ५८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३१० बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील २८७, तेलंगणा, बुलडाणा एक, गडचिरोली १४, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
कोरोनाची दुसरी लाट परसरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. त्यामुळे कोरोनाची बाधा होवू नये यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. ६० वर्षानंतरच्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे अत्यावश्य असल्याच्या सूचना प्रशासनाने  दिल्या आहे.
 तालुकानिहाय रूग्ण 
आज बाधित आढळलेल्या १७२ रूग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील ४५, चंद्रपूर तालुका १२, बल्लारपूर पाच, भद्रावती १७ , ब्रम्हपुरी एक, नागभिड एक, सिंदेवाही आठ, मूल १७, सावली तीन, गोंडपिपरी सहा, राजुरा पाच, चिमूर पाच, वरोरा १६, कोरपना २५, जिवती एक व इतर ठिकाणच्या 5 रुग्णांचा समावेश आहे. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: 172 new patients found, 169 free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.