१५२ कोरोना पॉझिटिव्ह १४७ निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:29 IST2020-12-06T04:29:56+5:302020-12-06T04:29:56+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासात १४७ जणांनी कोरोनावर मात केली तर १५२ नवीन बाधितांची भर पडली. चौघांचा मृत्यू झाल्याने ...

152 corona positive 147 negative | १५२ कोरोना पॉझिटिव्ह १४७ निगेटिव्ह

१५२ कोरोना पॉझिटिव्ह १४७ निगेटिव्ह

चंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासात १४७ जणांनी कोरोनावर मात केली तर १५२ नवीन बाधितांची भर पडली. चौघांचा मृत्यू झाल्याने मृतकांची संख्या ३१४ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २० हजार ६०७ झाली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १८ हजार ३८२ झाली. सध्या एक हजार ९११ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात एक लाख ५३ हजार ९८३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ३१ हजार १०७ नमुने निगेटिव्ह आले. आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील गजानन महाराज चौक येथील ६९ वर्षीय पुरूष, तुकूम येथील ६२ वर्षीय महिला, गुरूनगर भद्रावती येथील ८१ वर्षीय पुरूष व मोतारा येथील ६४ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. ३१४ बाधित मृतकांमध्ये जिल्ह्यातील २९१, तेलंगणा, बुलडाणा, भंडारा, वर्धा येथील प्रत्येकी गडचिरोली १४ व यवतमाळ येथील पाच बाधितांचा समावेश आहे.

तालुकानिहाय रूग्ण

आज पॉझिटिव्ह आढळलेल्या १५२ रूग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील ५२, चंद्रपूर सहा, बल्लारपूर नऊ, भद्रावती १८, ब्रह्मपुरी १२, नागभीड तीन, सिंदेवाही व सावली प्रत्येकी एक, मूल सात, राजुरा चार, चिमूर १६, वरोरा १५, कोरपना तीन व इतर ठिकाणातील पाच रूग्णांचा समावेश आहे.

Web Title: 152 corona positive 147 negative