शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

११ पंचायत समितीवर महिलाराज

By admin | Updated: September 14, 2014 23:59 IST

रविवारी पार पडलेल्या पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीमध्ये १५ पंचायत समितीपैकी तब्बल ११ पंचायत समितीमध्ये महिलांनी सत्ता मिळविली. यात ८ पंचायत समितीमध्ये काँग्रेस,

आठ ठिकाणी काँंग्रेसचा झेंडा : भाजपा तीन, राष्ट्रवादी दोन, युवाशक्ती, शेतकरी संघटनेकडे प्रत्येकी एक पंचायत समितीचंद्रपूर : रविवारी पार पडलेल्या पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीमध्ये १५ पंचायत समितीपैकी तब्बल ११ पंचायत समितीमध्ये महिलांनी सत्ता मिळविली. यात ८ पंचायत समितीमध्ये काँग्रेस, भाजपा तीन, राष्ट्रवादी काँग्रेसने दोन तर, युवाशक्ती संघटना आणि शेतकरी संघटनेने प्रत्येकी एका पंचायत समितीवर सत्ता मिळविली आहे. चंद्रपूर पंचायत समितीमध्ये मागील साडेबारा वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला यावर्षी सत्ताबाहेर पडावे लागले. चंद्रपूर, राजूरा, सिंदेवाही, नागभीड, वरोरा, ब्रह्मपुरी, मूल, गोंडपिपरी पंचायत समितीमध्ये काँग्रेसने झेंडा फडकावला आहे. बल्लारपूर, पोंभूर्णा, भद्रावतीमध्ये भाजप, जिवती तसेच सावली पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी, कोरपना पंचायत समितीमध्ये शेतकरी संघटना आणि चिमूरमध्ये युवाशक्ती संघटनेने आपला झेंडा रोवला आहे.चंद्रपूर- येथील पंचायत समितीमध्ये मागील साडेसात वर्षापासून पंचायत समितीमध्ये सत्ता असलेल्या भाजपला यावेळी सत्तेबाहेर पडावे लागले. १२ सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये सभापतीपदी रोशन पचारे यांची निवड करण्यात आली. तर, उपसभापतीपदी दुसऱ्यांदा गोंडवाणा गणतंत्र पार्टीचे मनोज धर्मराव आत्राम विजयी झाले. कांँग्रेसला ६ भाजपाला ४ मते मिळाली. भाजपाच्या सदस्य सविता नवले, गोपिका दळांजे यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. १२ सदस्य असलेल्या चंद्रपूर पंचायत समितीमध्ये मागील साडेसात वर्षांपासून भाजपची सत्ता होती. अडीच वर्षापूर्वी भाजपचे सहा तसेच एक अपक्ष असे मिळून पंचायत समितीवर सत्ता मिळविली. मात्र रविवारी पार पडललेल्या निवडणुकीत काँग्रेसने ४, राष्ट्रवादी १, अपक्ष एक असे सहा सदस्य मिळून पंचायत समितीवर काँग्रेसने झेंडा फडकविला. काँग्रेसचे रोशन पचारे यांनी भाजपचे बंडू माकोडे तर, उपसभापतीपदी मनोज आत्राम यांनी बकुवाले यांना पराभूत केले. बल्लारपूर- पंचायत समिती सभापतीपद नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलासाठी राखीव होते. सभापतीपदासाठी भाजपाच्या चंद्रकला नरेंद्र बोबाटे यांनी एकमेव अर्ज सादर केला. त्यांची अविरोध निवड करण्यात आली. तर, उपसभापतीपदासाठी विद्यमान उपसभापती भाजपाच्या सुमन लोहे यांनी तर, काँग्रेसकडून अनेकश्वर मेश्राम यांनी अर्ज सादर केला. दोघांनाही सारखे मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यात काँग्रेसचे अनेकश्वर मेश्राम यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली. राजुरा- आठ सदस्यीय पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या निर्मला कुळमेथे अविरोध निवडून आल्या. येथील सभापती पद अनुसुूचित जमातीसाठी राखीव होते. पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे तीन, शेतकरी संघटना चार, शिवसेना एक अशी सदस्य संख्या आहे. उपसभापती पदासाठी निवडणूक पार पडली. यात शेतकरी संघटनेच्या चंद्रकला ढवस यांच्या विरोधात काँग्रेसचे अब्दूल जमिर अब्दूल हमिद उभे होते. ढवस तसेच हमिद यांना प्र्रत्येकी चार मते पडल्याने ईश्वरचिठ्ठीने उपसभापतीची निवड करण्यात आली. यात चंद्रकला ढवस विजयी झाल्या.सिंदेवाही- आठ सदस्य संख्या असलेल्या सिंदेवाही पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे ५ तसेच भाजपाचे तीन सदस्य आहे. पार पडलेल्या सभापती-उपसभापतीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या रुपा सुरपान यांचा विजय झाला. काँग्रेसकडून रुपा सुरपाम तर, भाजपाकडून लता डोंगरवार निवडणूक रिंंगणात होत्या. सुरपाम यांना पाच तर, डोंगरवार यांना तीन मते मिळाली. उपसभापती पदासाठी कांँग्रेसचे रमाकांत लोधे यांना पाच, भाजपाच्या लता डोंगरवार यांना तीन मते मिळाली. या पंचायत समितीमध्ये कांँग्रेसने सत्ता मिळविली आहे.देवाडा- पोंभूर्णा पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे बापू चिंचोलकर सभापतीपदी तर, महेश रणदिवे यांची उपसभापतीपदी अविरोध निवड झाली. चार सदस्यीय पंचायत समितीमध्ये सभापतीपदी यापूर्वी अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षण असल्याने भाजपाच्या भारती कन्नाके सभापतीपदी होत्या. आता ओबीसी(नामाप्र) चे आरक्षण असल्याने भाजपाचे बापू चिंचोलकर यांची सभापतीपदी निवड करण्यात आली. चिंचोलकर यांचा सभापती पदासाठी तसेच उपसभापतीपदासाठी रणदिवे यांनीच अर्ज भरल्यामुळे येथील निवडणूक अविरोध झाली.