शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

१०८ ने दिले एक लाखांवर रुग्णांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST

रुग्णांना वेळेवर उपचार व्हावे, या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय आरोय अभियानातंर्गत १०८ क्रमांकाची रुग्णावाहिकेला सुरुवात केली. ग्रामीण भागात आजही दळणवळाच्या सोई उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना त्वरीत जिल्हा रुग्णालयात किंवा शहरातील रुग्णालयात नेण्यासाठी अडचण जाते. त्यामुळे अनेकांना जीव गमावावा लागत होता.

ठळक मुद्देपाच वर्षांची आकडेवारी : रुग्णांना मिळतेय तात्काळ सेवा

परिमल डोहणे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रुग्णांना तत्काळ रुग्णालयात पोहचविण्याच्या उद्देशाने शासनाने १०८ क्रमांकाची रुग्णावाहिका सुरु केली. या रुग्णवाहिकेने मागील पाच वर्षांत एक लाख ३० हजार ५१० रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहचवून जीवदान दिले आहे.रुग्णांना वेळेवर उपचार व्हावे, या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय आरोय अभियानातंर्गत १०८ क्रमांकाची रुग्णावाहिकेला सुरुवात केली. ग्रामीण भागात आजही दळणवळाच्या सोई उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना त्वरीत जिल्हा रुग्णालयात किंवा शहरातील रुग्णालयात नेण्यासाठी अडचण जाते. त्यामुळे अनेकांना जीव गमावावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेता शासनाने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरु केली आहे. मागील चार वर्र्षींच्या आकडेवारी लक्षात घेतल्यास ही रुग्णवाहिका रुग्णांना नवसंजीवनी देत असल्याचे सिद्ध होत आहे. सन २०१४ पासून या रुग्णवाहिकेने आॅक्टोबर २०१९ पर्यंत एक लाख ३० हजार ५१० रुग्णांना जीवदान दिले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सुर्व सोईसुविधा उपलब्ध असलेल्या २३ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. या रुग्णवाहिकेमध्ये आॅपरेशन हेड डॉ. दीपककुमार उके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व्यवस्थापक डॉ. चेतन कोरडे यांच्या नेतृत्वात रुग्णवाहिकेवर ५४ ड्रायव्हर, ४४ डॉक्टर सेवा देत आहेत. दरम्यान रुग्णांच्या नातेवाईकांनी फोन करुन माहिती दिल्यास सदर रुग्णवाहिका त्वरीत त्या घटनास्थळावर जाऊन त्याला रुग्णालयात हजर करते.विशेष म्हणजे, १०८ रुग्णवाहिकेसोबत डॉक्टरही पाठविला जातो. ते रुग्णांवर प्राथमिक उपचार करीत असल्याने रुग्णालयात जातपर्यंत रुग्ण दगावण्याची शक्यता कमी होत आहे.रुग्णाच्या कुटुंबियांकडून फोन आल्यानंतर उपलब्ध असलेली रुग्णवाहिका त्वरित त्याठिकाणी पाठविली जाते. तसेच रुग्णवाहिकेतील डॉक्टरही आपतकालिन परिस्थितीत रुग्णावर उपचार करीत असतात. त्यामुळे रुग्णांवर वेळेवर व सुव्यस्थित उपचार होऊ शकतो.-डॉ. चेतन कोरडे, जिल्हा व्यवस्थापकआपातकालिन सेवेत रुग्णाला योग्य सेवा मिळावी यासाठी आमची चमू तत्पर असते. रुग्णवाहिकेतील सर्व वैद्यकीय साहित्यांची नेहमीच देखभाल व दुरुस्ती करण्यात येते. त्यामुळे कोणतीही स्थिती उदभवल्यास त्यावर वेळेवर यशस्वी उपचार करता येतो.-डॉ. दीपककुमार उके, आॅपरेशन हेड

टॅग्स :hospitalहॉस्पिटल