SEBI मध्ये ग्रेड A अधिकाऱ्यांची भरती; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 14:51 IST2025-10-31T14:50:41+5:302025-10-31T14:51:08+5:30
SEBI ग्रेड A अधिकारी पद भारतातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या रेग्युलेटरी सर्व्हिसेसमधील नोकरींपैकी एक आहे.

SEBI मध्ये ग्रेड A अधिकाऱ्यांची भरती; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया...
SEBI Jobs: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी संधी आली आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने ग्रेड A अधिकारी (Assistant Manager) पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरतीत एकूण 110 पदे भरण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया SEBI च्या अधिकृत संकेतस्थळावर- www.sebi.gov.in उपलब्ध आहे.
रिक्त पदांची माहिती
या भरतीत विविध विभागांमध्ये एकूण 110 जागा भरल्या जाणार आहेत.
| विभाग | पदसंख्या | 
|---|---|
| सामान्य (General) | 56 | 
| कायदा (Legal) | 20 | 
| माहिती तंत्रज्ञान (IT) | 22 | 
| संशोधन (Research) | 4 | 
| राजभाषा (Official Language) | 3 | 
| अभियांत्रिकी (Engineering) | 5 | 
पहिला टप्पा (Phase I): 10 जानेवारी 2026
दुसरा टप्पा (Phase II): 21 फेब्रुवारी 2026
तिसरा टप्पा (Interview): नंतर जाहीर केला जाईल
अर्ज कसा करायचा?
SEBI च्या अधिकृत संकेतस्थळावर www.sebi.gov.in जा.
होमपेजवरील “Careers / Recruitment” लिंकवर क्लिक करा.
रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
ऑनलाइन अर्ज फॉर्म नीट भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क | जीएसटीसह एकूण | 
|---|---|---|
| अनारक्षित / OBC / EWS | ₹1000 | ₹1180 | 
| SC / ST / PwBD | ₹100 | ₹118 | 
पेमेंट डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS किंवा मोबाइल वॉलेटद्वारे करता येईल.
निवड प्रक्रिया (Selection Process)
ही भरती तीन टप्प्यांत होईल
फेज I (Online Screening Test): दोन प्रश्नपत्रिका, प्रत्येकी 100 गुणांच्या, बहुपर्यायी प्रश्नांसह.
फेज II (Main Online Exam): पुन्हा दोन पेपर, प्रत्येकी 100 गुणांचे, अधिक सखोल विषयांवर आधारित.
फेज III (Interview): पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
अर्ज का करावा ?
SEBI ग्रेड A अधिकारी पद भारतातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या रेग्युलेटरी सर्व्हिसेसमधील नोकरींपैकी एक आहे. या पदावर नियुक्त अधिकाऱ्यांना भांडवली बाजारांचे नियमन, गुंतवणूकदार संरक्षण, आणि आर्थिक विश्लेषणाशी संबंधित काम करावे लागते. ही भरती अर्थशास्त्र, कायदा, आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांसाठी एक मोठी संधी मानली आहे.