Railway Recruitment : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! भरतीसाठी अधिसूचना जारी, आजच करा अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 04:39 PM2022-07-08T16:39:53+5:302022-07-08T16:40:29+5:30

West Central Railway Recruitment 2022 Notification : एनटीपीसी पदवीधर पदांसाठी एकूण 55 आणि एनटीपीसी 12वी उत्तीर्ण पदांसाठी 66 जागा उपलब्ध आहेत.

railway recruitment 2022 notification released today check eligibility criteria and more details | Railway Recruitment : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! भरतीसाठी अधिसूचना जारी, आजच करा अर्ज 

Railway Recruitment : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! भरतीसाठी अधिसूचना जारी, आजच करा अर्ज 

Next

नवी दिल्ली : रेल्वे भर्ती सेल, पश्चिम मध्य रेल्वेने (WCR) स्टेशन मास्टर, स्टेशन कमर्शियल कम तिकीट आणि सीनियर क्लर्क कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट  अशा विविध एनटीपीसी (नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांवर जीडीसीई कोट्याअंतर्गत भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एनटीपीसी पदवीधर पदांसाठी एकूण 55 आणि एनटीपीसी 12वी उत्तीर्ण पदांसाठी 66 जागा उपलब्ध आहेत. सिंगल स्टेज कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) त्यानंतर अॅप्टिट्यूड टेस्ट/टायपिंग स्किल टेस्ट (जेथे लागू असेल तिथे) असेल.

या पदांसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2022 आहे. यासाठी शैक्षणिक पात्रतेबाबत बोलयचे झाल्यास स्टेशन मास्टर, सीनियर कमर्शियल कम तिकीट क्लर्क आणि सीनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असावा. दुसरीकडे, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 12 वी पास असावा.

वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 18 वर्षांवरून 42 वर्षे ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे, ओबीसी उमेदवारांसाठी 45 वर्षे आणि एससी एसटी उमेदवारांसाठी 47 वर्षे ठेवण्यात आले आहेत. तर स्टेशन मास्टर पदासाठी दरमहा 35400 रुपये, सिनियर कमर्शियस कम तिकीट क्लर्क पदासाठी 29200 रुपये, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदासाठी 29200 रुपये, कमर्शियल कम तिकीट क्लर्क पदासाठी 21700 रुपये, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट पदासाठी 19900 रुपये आणि ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट पदासाठी 19900 रुपये प्रति महिना वेतन मिळेल. 

Railway Recruitment Process
- सिंगल स्टेज कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT)
- एप्टीट्यूड टेस्ट / टायपिंग स्किल टेस्ट  (जेथे लागू असेल तेथे)
- डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन / मेडिकल एग्झामिनेशन

Web Title: railway recruitment 2022 notification released today check eligibility criteria and more details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.