JOB Alert : गुड न्यूज! 10 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; रेल्वेमध्ये मोठी भरती, आजच करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 05:01 PM2022-07-06T17:01:17+5:302022-07-06T17:09:47+5:30

JOB Alert : रेल्वेमध्ये (Railway Recruitment 2022) काही पदांसाठी भरती केली जाणार (Recruitment) आहे

JOB Alert railway rrc ncr recruitment 2022 for apprentice posts check qualification vacancy notification | JOB Alert : गुड न्यूज! 10 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; रेल्वेमध्ये मोठी भरती, आजच करा अर्ज

JOB Alert : गुड न्यूज! 10 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; रेल्वेमध्ये मोठी भरती, आजच करा अर्ज

Next

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. रेल्वेमध्ये (Railway Recruitment 2022) काही पदांसाठी भरती केली जाणार (Recruitment) आहे. RRC ने उत्तर मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू केली आहे. त्याअंतर्गत उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट rrcpryj.org वर जाऊन या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

एकूण 1659 पदे भरली जाणार आहेत. ज्यामध्ये फिटर, प्लम्बर, बिल्डर, इलेक्ट्रिशियन, पेंटर यासह अनेक ट्रेडच्या पदांचा समावेश आहे. यामध्ये प्रयागराजसाठी 703, झाशीसाठी 660 आणि आग्रासाठी 296 पदे आहेत.

शैक्षणिक पात्रता

दहावी पास असलेले आणि ITI असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. 

वयोमर्यादा

अर्जदाराचे वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे. 

शुल्क 

पदांसाठी अर्ज करण्यासाठी 100 रुपये शुल्क देखील जमा करावे लागेल.

असा करा अर्ज 

- अधिकृत वेबसाईट rrcpryj.org ला भेट द्या.

- आता अप्रेंटिस भरतीसाठी अर्जाच्या लिंकवर क्लिक करा. 

- एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये उमेदवारांना विनंती केलेली माहिती भरून नोंदणी करावी लागेल. 

- आता क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा आणि अर्ज भरा. 

- संबंधित कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: JOB Alert railway rrc ncr recruitment 2022 for apprentice posts check qualification vacancy notification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.