Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 20:15 IST2025-08-11T20:11:42+5:302025-08-11T20:15:05+5:30

Indian Overseas Bank Recruitment 2025: बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

Indian Overseas Bank Recruitment 2025: Check Application Process, Important Dates | Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव

Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव

बँकेतनोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने मोठ्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ७५० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज प्रक्रियेला १० ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आयओबीची अधिकृत वेबसाइट http://www.iob.in येथे भेट द्यावी.

अप्रेंटिस अॅक्ट १९६१ आणि बँकेच्या अप्रेंटिसशिप धोरणानुसार, एकूण ७५० रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रासाठी ८५ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

इंडियन ओव्हरसीज बँक भरती: पात्रता निकष

उमेदवार हा भारताचा नागरिक असावा आणि त्याने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असावी. सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग (EWS) श्रेणीतील उमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि कमाल वय २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC) आणि बेंचमार्क अपंगत्व (PwBd) असलेल्या उमेदवारांना सवलत दिली जाते.

इंडियन ओव्हरसीज बँक भरती: निवड प्रक्रिया

उमेदवारांची एकूण तीन टप्प्यात निवड केली जाणार आहे. सर्वात प्रथम उमेदवारांची लेखी परीक्षा होईल. शिवाय, उमेदवारांची स्थानिक भाषेची चाचणी घेतली जाईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. शेवटच्या आणि तिसऱ्या टप्प्यात उमेदवाराची वैद्यकीय तपासणी केली जाईल. 

इंडियन ओव्हरसीज बँक भरती: किती पगार मिळणार?

मेट्रो शहरांसाठी: १५,०००/- प्रति महिना
शहरी भागांसाठी: १२,०००/- प्रति महिना
अर्ध-शहरी / ग्रामीण भागांसाठी: १०,०००/- प्रति महिना

इंडियन ओव्हरसीज बँक भरती: अर्ज कसा करायचा?

- बँकेच्या अधिकृत वेबसाईट http://www.iob.in ला भेट द्या.
- 'Career' किंवा 'Recruitment' या पर्यायावर अप्रेंटिस भरतीची जाहिरात डाउनलोड करा आणि काळजीपूर्वक वाचा.
- पात्र असल्यास ऑनलाइन अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क ऑनलाइन भरून सबमिट करा.

Web Title: Indian Overseas Bank Recruitment 2025: Check Application Process, Important Dates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.