सुवर्ण संधी! अर्थ व सांख्यिकी विभागात २६० पदांसाठी भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 11:24 AM2023-07-26T11:24:12+5:302023-07-26T11:24:34+5:30

अर्थ व सांख्यिकी संचालनालय ही राज्य सरकारची प्रमुख सांख्यिकीय संस्था म्हणून कार्यरत आहे.

Golden opportunity! Recruitment for 260 posts in Department of Economics and Statistics | सुवर्ण संधी! अर्थ व सांख्यिकी विभागात २६० पदांसाठी भरती

सुवर्ण संधी! अर्थ व सांख्यिकी विभागात २६० पदांसाठी भरती

googlenewsNext

अर्थ व सांख्यिकी विभागातील सहायक संशोधन अधिकारी, सांख्यिकी सहायक व अन्वेषक पदांच्या २६० पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत ५ ऑगस्ट आहे.

अर्थ व सांख्यिकी संचालनालय ही राज्य सरकारची प्रमुख सांख्यिकीय संस्था म्हणून कार्यरत आहे. सांख्यिकीय बाबींसंबंधी राज्य आणि केंद्र सरकारमधील दुवा म्हणूनही हे संचालनालय काम पाहते. कार्यालयीन सांख्यिकी गोळा करणे, सर्वेक्षण, गणना व कार्यालयीन सांख्यिकी उपलब्ध नाही, अशा बाबींसाठी विशेष अभ्यास घेणे, अशा संकलित माहितीचे विश्लेषण करणे, महत्त्वाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन करणे, नियमितपणे सांख्यिकीय प्रकाशने प्रकाशित करणे, सांख्यिकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, राज्य सरकारच्या विविध विभागातील सांख्यिकीय कक्षांतील कामाचे समन्वयन साधणे व त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे आणि राज्य सरकारला आर्थिक व सांख्यिकीय बाबींवर सल्ला देणे, ही संचालनालयाची प्रमुख कामे आहेत.

शैक्षणिक पात्रता 

पदांसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी / बायोमेट्री / गणित / अर्थशास्त्र / इकॉनॉमेट्रिक्स / गणिती अर्थशास्त्र / वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदवी असावी.

परीक्षा स्वरूप 

मराठी भाषा ५० प्रश्न, ५० गुण
 इंग्रजी भाषा ५० प्रश्न, ५० गुण
 सामान्य ज्ञान ५० प्रश्न, ५० गुण
 बौद्धिक चाचणी ५० प्रश्न, ५० गुण
एकूण २०० प्रश्न, २०० गुण
परीक्षा शुल्क
 खुला प्रवर्ग – १००० रुपये
 राखीव प्रवर्ग - ९००  रुपये

निवड प्रक्रिया  

ऑनलाइन परीक्षा – पात्र उमेदवारांची २०० गुणांची ऑनलाइन परीक्षा  सप्टेंबर २०२३ मध्ये घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता 

पदांसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी / बायोमेट्री / गणित / अर्थशास्त्र / इकॉनॉमेट्रिक्स / गणिती अर्थशास्त्र / वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदवी असावी. 
वयोमर्यादा
किमान १८ कमाल ३८ वर्षे तर मागासवर्ग प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे

Web Title: Golden opportunity! Recruitment for 260 posts in Department of Economics and Statistics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.