शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
3
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
4
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
5
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
6
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
7
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
8
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
9
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
10
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
11
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
12
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
13
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
14
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
15
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
16
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
17
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
18
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
19
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
20
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी

इयत्ता १०वी (पूर्ण संस्कृत) कृतिपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 11:15 AM

संपूर्ण संस्कृत - ‘आमोद:’ या पाठ्यपुस्तकावर यंदाच १०० गुणांची कृतिपत्रिका असणार आहे. कृतिपत्रिकेची घटकनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे असणार आहे.

ठळक मुद्देइयत्ता १०वी (पूर्ण संस्कृत) कृतिपत्रिकाघटकनिहाय गुणविभागणी

इयत्ता १०वी (पूर्ण संस्कृत) कृतिपत्रिकाविद्यार्थी मित्रहो,शालांत परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. संस्कृत हा गुणांची टक्केवारी वाढवणारा विषय म्हणून विद्यार्थ्यांमध्ये आवडीचा ठरलेला आहे. आपणही संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळविण्यासाठी प्रयत्नशील असालच!आपण संस्कृतच्या कृतिपत्रिकेचा विचार करता याचवर्षी पाठ्यपुस्तक बदलाबरोबर मूल्यमापनातही झालेल्या बदलाकडे डोळसपणे पाहाणे गरजेचे आहे. मूल्यमापनातील बदलांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिल्यास ‘पैकीच्या पैकी गुण मिळवणे’ कसे सहजसाध्य करता येईल याकडे पाहता येईल.संपूर्ण संस्कृत - ‘आमोद:’ या पाठ्यपुस्तकावर यंदाच १०० गुणांची कृतिपत्रिका असणार आहे. कृतिपत्रिकेची घटकनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे असणार आहे.घटकनिहाय गुणविभागणीघटक                           एकूण गुण१) सुगमसंस्कृतम्      १५२) गद्यम्                  २२३) पद्यम्                  २०४) लेखनकौशलम्     १५५) भाषाभ्यास:          २०६) अपठितम्             ०८‘सुगमसंस्कृतम्’ या घटकामध्ये चित्रपदकोष संख्या, घड्याळी वेळ, वार व व्याकरणाच्या काही मूलभूत गोष्टींचा समावेश केला आहे. भाषेच्या व्यावहारिक उपयोजनाचे मूल्यमापन विभाग एकमध्ये आहे.गद्य विभागामध्ये पाठांचे आकलन त्यावर आधारित संस्कृत प्रश्न, शब्दज्ञानांवरील कृती, अव्यये ओळखणे अशा प्रश्नांचा समावेश आहे. त्यासाठी परिच्छेद पठीतच असणार आहे. पाठातील माहितीचे पृथक्करण विद्यार्थ्याला करता येते की नाही, हे पाहण्यासाठी क्रमसंयोजन व रेखाचित्रांसारख्या कृ ती अंतर्भूत केल्या आहेत.पद्य विभाग २० गुणांचा असून, आकलन, अन्वय सरलार्थ लेखन तसेच सुभाषिते शुद्ध व स्पष्ट लिहिणे, ही कृती महत्त्वाची ठरते. पद्याचा भावार्थ स्पष्टीकरणासाठी माध्यम भाषेतून अभिव्यक्त होण्याची संधी दिली आहे.लेखन कौशल्यामध्ये वाक्यरचना, निबंध, संवाद, माध्यम भाषेतून संस्कृतातील अनुवाद या विविध कृतितून विद्यार्थ्यांचा भाषिक विकास साधला आहे.भाषाभ्यासाच्या तालिका व व्याकरणाच्या कृती प्रामुख्याने पाठाखाली दिल्याप्रमाणे विविध प्रकारच्या असणार आहेत. त्यामध्ये तालिकापूर्तीसाठी इयत्ता ८वी व इयत्ता ९ वीच्या व्याकरणावर आधारित काही तक्ते पूर्ण करावयास असणार आहेत. सूचनेप्रमाणे बदल यासारख्या कृतींमध्ये प्रयोग व प्रयोजकावर प्रश्न निर्धारित केलेले असणार आहेत.अपठीत विभागात नावाप्रमाणेच पुस्तकाबाहेरील एक उतारा व त्यावर ६ प्रकारच्या कृती विचारल्या जाणार आहेत. त्यापैकी कोणत्याही चार प्रकारच्या कृती बिनचूक सोडवावयाच्या आहेत. पद्याचा विचार करता अपठीत दोन श्लोक असणार आहेत. त्यापैकी एका श्लोकावर संस्कृतमध्ये उत्तर लिहावे लागेल व दुसरी कृ ती समानार्थी शब्दाची असेल व दुसरा श्लोक जालचित्र स्वरुपाच्या कृ तीने पूर्ण करायचा असणार आहे.१०० गुणांच्या या संपूर्ण संस्कृतच्या कृतिपत्रिकेला सामोरे जाताना पुढील गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्यात.१) संस्कृत भाषेच्या लेखन नियमांचा विचार कृतिपत्रिका सोडवताना निश्चितपणे व्हावा.२) गद्यांचे प्रश्न सोडवताना परिच्छेदाचे नीट वाचन करुन कृती सोडवाव्यात.३) पद्याच्या लेखनात सुभाषिते शुद्ध व स्पष्ट, संधीचा विचार करुन लिहावीत. पाठांतर पक्के असावे.४) संस्कृतानुवाद, निबंध, चित्रवर्णनात छोट्या - छोट्या संस्कृत वाक्यांचा समावेश करावा.५) भाषाभ्यासाच्याही कृती नीटपणे वाचून आकलनाने त्यातील बारकावे जाणून लिहाव्यात.६) ‘अपठीत’ म्हणून घाबरुन न जाता पुन्हा पुन्हा वाचून अर्थसंगती लावून कृतींचा विचार केल्यास गोंधळ उडणार नाही.७) कृतिपत्रिका पूर्ण सोडवल्यावर शांतपणे ऱ्हस्व, दीर्घ, लेखन नियम, संधी नियमांप्रमाणे आहे ना, हे नीट पहावे व आवश्यकतेनुसार बदल करावेत.८) स्वच्छ, नीटनेटके, वळणदार अक्षर काढून कृतिपत्रिका आकर्षक व प्रभावी करण्याचा प्रयत्न करावा.येणाऱ्या शालांत परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!

  • मं. प्र. आगाशे,

फाटक हायस्कूल, रत्नागिरी

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षा