विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: October 3, 2016 02:54 IST2016-10-03T02:54:50+5:302016-10-03T02:54:50+5:30

लोणार तालुक्यातील घटना; लोंबकळत्या विजेच्या तारेला झाला होता स्पर्श.

Youth's death by electric shocks | विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

लोणार(जि. बुलडाणा), दि. २- तालुक्यातील सावरगाव मुंढे येथील बद्रीनाथ शेषराव चव्हाण या पंचवीस वर्षीय युवकाचा विद्युत तारेचा शॉक लागून २ ऑक्टोबर रोजी दु पारी ४ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. बद्रीनाथ चव्हाण त्याचा घरात काम करीत असताना अचानक लोंबकळलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाला. सदर तारेत विद्युत प्रवाह असल्यामुळे शॉक लागून बद्रीनाथ चव्हाणचा मृत्यू झाला. त्याच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा आप्त परिवार आहे. याप्रकरणी पुढील तपास बिट जमादार गीते करीत आहेत.

Web Title: Youth's death by electric shocks