लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : दुचाकीचे ब्रेक दाबल्यावर खाली पडून डोक्याला जबर मार लागल्याने येथील गोकुलधाममधील २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मलकापूर- सोलापूर राज्य महामार्गावर सोमवारी मध्यरात्री दीपक नगरनजीक ही घटना घडली.गोकुलधाममधील रहिवाशी तसेच डॉ.व्ही.बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी वैभव गजानन अढाव (वय २२) सोमवार, १३ रोजी दु पारी १२.३0 वाजता दुचाकी क्रमांक एमएच २८-ए-१६९२ ने घराकडे जात होता. दरम्यान, सायकलवर रस्ता ओलांडणार्या गुरख्यास वाचविण्याच्या नादात त्याने दुचाकीचे ब्रेक दावले. त्यात गाडी घसरून तो खाली पडला. डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिली. उपचारासाठी त्याला रुग्णालयात हलविण्यात आले; पण तो मृत झाल्याचे सांगण्यात आले. घटनेचा तपास पीएसआय संजीवनी पुंडगे करीत आहेत.
मोटारसायकल अपघातात तरूण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:22 IST
दुचाकीचे ब्रेक दाबल्यावर खाली पडून डोक्याला जबर मार लागल्याने येथील गोकुलधाममधील २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मलकापूर- सोलापूर राज्य महामार्गावर सोमवारी मध्यरात्री दीपक नगरनजीक ही घटना घडली.
मोटारसायकल अपघातात तरूण ठार
ठळक मुद्देमलकापूर- सोलापूर राज्य महामार्गावर सोमवारी मध्यरात्री घडली घटना डॉ.व्ही.बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी वैभव गजानन अढावचा जागीच मृत्यू