बुलडाणा जिल्ह्यातील युवक स्वयंरोजगाराकडे

By Admin | Updated: December 22, 2014 00:52 IST2014-12-22T00:52:25+5:302014-12-22T00:52:25+5:30

५८३ लाभार्थी : दोन हजार ७0३ बेरोजगारांना रोजगार.

Youth in Buldhana district self-employed | बुलडाणा जिल्ह्यातील युवक स्वयंरोजगाराकडे

बुलडाणा जिल्ह्यातील युवक स्वयंरोजगाराकडे

बुलडाणा : महागडे शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील युवकांनी स्वयंरोजगाराची कास धरली आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमातून गत सात वर्षांत जिल्ह्यातील जवळपास २ हजार ७0३ सुशिक्षित बेरोजगारांनी रोजगार मिळाला आहे.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाला जिल्ह्यात बर्‍याच प्रमाणात प्रतिसाद मिळून बेरोजगारांनी याचा लाभ घेतला. मागील सात वर्षात या योजनेसाठी ५८३ बेरोजगार युवक युवती लाभार्थी निवडले गेले. या लाभार्थ्यानी सुरू केलेल्या लघू व माध्यम व्यवसायात आतापर्यत जिल्ह्यातील सुमारे २७0३ जणांना रोजगार मिळाला आहे.
पंतप्रधान रोजगार निर्माण कार्यक्रम २00८ पासून केंद्रीय सूक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे राज्यात खादी आणि ग्रामोद्योग मंडळ आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत राबवण्यात येत आहे. खनिज आधारित उद्योग, वनसंपत्ती उद्योग, कृषी व अन्न प्रक्रिया, पॉलिमर व रसायनांवर आधारित, ग्रामीण अभियांत्रिकी तसेच अपारंपरिक उद्योग, वस्त्रोद्योग, सेवा उद्योग आदी प्रकारातील उद्योग बेरोजगार सुरु करुन शकतात.

Web Title: Youth in Buldhana district self-employed