शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
5
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
6
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
7
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
8
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
9
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
10
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
11
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
12
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
13
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
14
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
15
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
16
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
17
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
18
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
19
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
20
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

यंदा खतांचा तुटवडा

By admin | Updated: May 30, 2014 00:37 IST

बुलडाणा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी मागणी १.५ लाख टन खताची, उपलब्ध केवळ २४ हजार टन !

बुलडाणा : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी झाला आहे. २0१३ च्या खरीप हंगामात ७१ हजार २८७ मे.टन रासायनिक खत उपलब्ध करून देण्यात आले होते; मात्र यंदाच्या खरीप हंगामासाठी मे महिन्याच्या अखेरपर्यंत केवळ २४ हजार ७९६ मे. टन खत उपलब्ध झाले आहे. यामुळे खरिपाच्या तोंडावर शेतकर्‍यांना खतापासून वंचित राहावे लागणार आहे. शेतकर्‍यांची खरीप हंगामासाठी जोरदार तयारी सुरू असून, शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शिवाय काही ठिकाणी पिकांची लागवडही सुरू आहे. पिकांसाठी आवश्यक रासायनिक खतांची उपलब्धता कमी आहे. येत्या काही महिन्यात खत पुरवठय़ात वाढ होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे; मात्र वर्तमानात खताची कमतरता शेतकर्‍यांसाठी अडचण निर्माण करणारी ठरू शकते. हीच बाब लक्षात घेऊन व्यापारीही चढत्या भावाने खतविक्री करीत शेतकर्‍यांची लुबाडणूक होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी कृषी विभागाकडून खरीप हंगामासाठी ७.४५ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होती. यावर्षी खरीप पेरणी क्षेत्रात वाढ झाली असून जिल्हा प्रशासनाने १ लाख ५६ हजार मे. टन खताची मागणी नोंदविली असतानाही मे महिन्याच्या शेवटपर्यंत पुरेशा प्रमाणात खतसाठा उपलब्ध झाला नाही.