शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी फोडल्या दारुच्या बाटल्या

By admin | Updated: May 1, 2017 23:34 IST

सावणा- ग्रामसभेनंतर उपस्थित सर्व महिलांनी गावातील अवैध दारू विक्री अड्ड्यांवर जाऊन तेथील दारूच्या बाटल्या फोडल्या.

सवणा : येथील ग्रामपंचायती कार्यालयमध्ये महाराष्ट्रदिनी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच नंदाबाई हाडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेमध्ये ७०० महिलांच्या सह्यांचे निवेदन देऊन गावातील अवैध धंदे कायम वरुपी बंद करण्यात यावे, असा ठराव मांडून पारित करण्यात आला. ग्रामसभेनंतर सर्व महिला गावातील अवैध दारु विक्री अड्ड्यावर जाऊन तेथील दारुचे बाटल्या बाहेर काढून फोडल्या.यावेळी जमलेल्या महिलांनी जुगार चालतो त्या ठिकाणवरील पत्ते फाडले व नंतर पोलीस स्टेशन चिखली यांना फोनद्वारे घटनेची माहिती दिली. गावात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असल्यामुळे तरुणांसह वृद्ध व लहान शाळकरी मुलं व्यसनाच्या आहारी गेले आहेत, यामुळे सामाजिक वातावरण खराब होत असून, अनेक संसाराची राखरांगोळी झाली आहे. यामुळे महिलांनी पुढाकार घेत, गावात अवैधधंदे चालविणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी महिलांनी पोलिसांकडे करण्यात आली.सकाळी झालेल्या ग्रामसभेत ग्रामसभेचे वाचन २०१६-१७ चे वार्षिक अहवालास मंजुरात देणे, मागील वर्षीच्या धर्तीवर वृक्षलागवड करणे, ग्रामपंचायत कामकाजात महिलांचा सहभाग वाढविणे, गावातील अवैध दारुबंदी, वरली-मटका व जुगार बंद करणे, समृद्ध महाराष्ट्र जन कल्याण योजना प्रतीक्षा यादी बनविणे, १४ व्या वित्त आयोग आराखड्यास मंजुरात देणेबाबत, ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ अभियान, विजय हिंमतराव भुतेकर अर्जानुसार शेतकऱ्यासह कर्जमाफी मिळणे व स्वामिनाथन आयोग लागू करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आले व तो ठराव केंद्र सरकार व राज्य सरकार यांना पाठविण्याचे ठरविण्यात आले आणि सवणा महसूल क्षेत्रात देशी दुकान, बिअर बार, वाइन शॉप यासारख्या दुकानास परवानगी देऊ नये, असे ठरविण्यात आले.