शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

महिलाही उतरल्या संपात!

By admin | Updated: June 7, 2017 00:45 IST

शेतकरी संपाला ग्रामीण भागातील जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित संपात ग्रामीण भागातूनही सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते आणि महिलाही या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.नांदुरा : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी संप पुकारला असून, नांदुरा तालुक्यातही शेतकरी संपात शेतकऱ्यांसह संपूर्ण समाजघटक सहभागी होत आहेत. सोमवारी सकाळी १० वाजता तालुक्यातील धानोरा, विटाळी, काटी, सिरसोडी येथील महिलाही या संपात सहभागी होत रस्त्यावर उतरल्या. यावेळी शेतकरी, महिला, मुलेबाळे, गुरेढोरे, बैलगाडी ट्रॅक्टरसह या शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीची मागणी करीत सात-बारा कोरा करून देण्याच्या घोषणा केल्या.राज्यातील शेतकरी सतत तीन वर्षांच्या दुष्काळाने होरपळून निघालेला असूनही शेतकरी वर्गाच्या पेरणीकरिता शासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. कर्ज पुनर्गठनामुळे शेतकरी पीक कर्जात पात्र नाही, त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी होणे गरजेचे आहे.लाखनवाडा येथेही बंद यशस्वीलाखनवाडा : लाखनवाडा येथे शेतकऱ्यांचा बंद १०० टक्के यशस्वी झाला. सोमवारी सकाळी जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता विजय पांढरे यांच्या नेतृत्वाखाली गावात फिरून बंद पाळण्याचे आवाहन केले असता सर्व लहान मोठ्या व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद करून उत्तम प्रतिसाद दिला. गावातील सर्व दुकाने बंद असल्यामुळे गावातील सर्व व्यवहार बंद पडली होते. हे सर्व शेतकरी बस थांब्यावर आल्यानंतर शेतकऱ्यांनी कांदे व दूध रस्त्यावर फेकले आणि तेथेच ठिय्या देऊन बसले.यामध्ये विजय बळवंत पांढरे शिवाजी त्र्यंबक पांढरे, शे. युनुस शे.युसुफ, दत्ता नामदेव बोदडे, संजय रामदास सावळे, भोजराज बाळकृष्ण हटकर, ज्ञानदेव तुकाराम पांढरे, रामदास सुपडू सावळे, अशोक एकनाथ पांढरे, शे.लतीब, कैलास बाबुराव पांढरे, शे.मोबीन शे.महेमुद, विजय बळीराम देशमुख, श्रीकृष्ण महिपत होळकर, उत्तम तुकाराम पांढरे, रंगलाल राघळा पवार आदीसह विविध राजकीय पक्षाचे व संघटनेचे कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांचा संपरामनगर : तालुक्यातील रामनगर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला. रामनगर येथे संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष रवी महाले यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा फेकला. यावेळी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. या आंदोलनात विशाल जैन, दीपक फाटे, आत्माराम कावडकार, गोपाल पाचपोर सोपान जुमडे, बाळू आखरे यांच्यासह राम नगर येथील शेतकरी बांधव हजर होते.