हुंड्यातील पैशासाठी विवाहितेस विष पाजले!

By Admin | Updated: May 1, 2017 23:41 IST2017-05-01T23:41:50+5:302017-05-01T23:41:50+5:30

खामगाव : लग्नामध्ये बाकी राहिलेली हुंड्याची रक्कम माहेरवरून आणण्यासाठी तगादा लावत विष पाजून मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद विवाहितेने दिली.

Wife poisoned for money in dowry | हुंड्यातील पैशासाठी विवाहितेस विष पाजले!

हुंड्यातील पैशासाठी विवाहितेस विष पाजले!

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव : लग्नामध्ये बाकी राहिलेली हुंड्याची रक्कम माहेरवरून आणण्यासाठी तगादा लावत विष पाजून मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद विवाहितेने दिली.
या फिर्यादीवरुन पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कविता संदीप तायडे या विवाहितेने शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली, की हुंड्याची रक्कम माहेरवरून आणण्यासाठी पती संदीप तायडे, सासरा बलदेव तायडे, सासू उषा तायडे, दीर संकेत तायडे यांनी वारंवार शारीरिक व मानसिक छळ करून घरातून काढून दिले. २६ एप्रिलच्या पूर्वी मुलाला घेऊन पतीच्या भेटीसाठी सासरवाडीत आली असता उपरोक्त सर्वांनी संगनमत करून जीवे मारण्याच्या उद्देशाने विष पाजले, अशा आशयाच्या तक्रारीवरून तसेच तालुका दंडाधिकाऱ्यांनी घेतलेल्या तोंडी रिपोर्ट व जबाबावरून पोलिसांनी पती संदीप तायडेसह चौघांविरुद्ध कलम ३२८, ४९८ (अ), ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Wife poisoned for money in dowry