शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

भेंडवळची घटमांडणी २८ एप्रिल रोजी

By admin | Updated: April 20, 2017 00:29 IST

घटमांडणीला ३०० वर्षाची परंपरा : पावसाच्या भाकिताकडे शेतकऱ्यांचे लक्ष

जयदेव वानखडे - जळगाव जामोदहंगामाची पीक परिस्थिती, पाऊसपाणी, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचा अंदाज सांगणारी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिध्द असलेली भेंडवळची घटमांडणी दरवर्षीप्रमाणे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर २८ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. यावर्षी पावसाचे भाकीत काय राहिल याकडे विदर्भातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात पूर्णानदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावी घटमांडणीची परंपरा ३०० वर्षापेक्षाही जास्त जुनी आहे. यातील काही भाकीते खरी ठरण्याचा अनुभव लोक घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा भेंडवळच्या मांडणीवर दृढ विश्वास आहे. मांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी हजारो शेतकरी उपस्थित असतात. या मांडणीचे भाकीत ऐकून पुढील हंगामामध्ये शेतात काय पेरायचे ते ठरवत असतात.आधुनिक हवामान खाते कितीही अचूक अंदाज देत असले तरी या युगातही भेंडवळची ही परंपरा जीवंत आहे. जनतेच्या मनात दृढ असलेली घटमांडणी ही २८ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेच्या दिवशी संध्याकाळी करण्यात येईल. तर २९ एप्रिल रोजी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज या मांडणीचे भाकीत जाहीर करतील.सुर्यास्तापुर्वी गावाबाहेरील शेतात चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत घटाची आखणी केली जाते. घटात घागर, मातीची ढेकळे, पुरी, पापड, सांडोळी, कुरडी, पान आणि त्यावर सुपारी ठेवली जाते. गहू, ज्वारी, तूर, उडीद, मुग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदुळ, सरकी, अंबाडी, वाटाणा, मसुर, करडी यासह १८ प्रकारच्या धान्यांची व खाद्य पदार्थांची प्रतिकात्मक मांडणी केली जाते व दुसऱ्या दिवशी पहाटेला सुर्योदयापुर्वी घटमांडणीत झालेले बदलाचे सुक्ष्म निरीक्षण करून यंदाचे भाकीत काय हे सांगितले जाते. या भाकीतापासून पिकांचा आणि पावसाचा अंदाज घेत यावर्षी कोणत्या महिन्यात पाऊस कमी किंवा जास्त प्रमाणात सांगितला हे लक्षात घेवून शेतकरी बांधव यंदा कोणत्या पिकाची पेरणी करावी हे ठरवत असतात. सर्वप्रथम कुठल्याही सुविधा उपलब्ध नसताना ३०० वर्षापूर्वी भेंडवळचे चंद्रभान महाराज यांनी या घटमांडणीस सुरूवात केली. त्याकाळी केवळ याच भाकीताचा आधार घेवून शेतकरी आपली हंगामी पिके घ्यायचा.गुडीपाडव्याला सुध्दा गावातील मारोतीच्या पारावर मांडणी करण्यात येते व दोन्ही मांडणीत साम्य असते. या दोन्ही मांडणीचे निकष जुळवून यंदाची भविष्यवाणी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज वाघ हे २९ एप्रिल रोजी शेतकऱ्यांना कथन करणार आहेत. तेव्हा काय दडले आहे यंदाच्या घटमांडणीत याकडे सर्व विदर्भातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.