शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
2
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
3
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
4
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
7
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
8
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
9
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
10
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
11
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
12
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
13
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
14
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
15
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
16
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
17
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
18
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजना मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:43 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत ८८ योजनांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी प्रशासकीय मान्यता दिली. ११ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार पाच कोटींपर्यंतच्या पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले असून, त्यानुसार सदरची मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ८८ पाणीपुरवठा योजनांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता दिली

नाशिक : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत ८८ योजनांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी प्रशासकीय मान्यता दिली. ११ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार पाच कोटींपर्यंतच्या पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले असून, त्यानुसार सदरची मान्यता देण्यात आली आहे.
यापूर्वी प्रशासकीय मान्यतेचे अधिकार जलव्यवस्थापन समितीला होते; मात्र प्रशासकीय मान्यता देताना स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पुरेसे मनुष्यबळ व तांत्रिक प्रशासकीय क्षमता नसल्यामुळे अनेक पाणीपुरवठा योजनांची योग्यप्रकारे छाननी न होता त्यांना मान्यता दिली जात असल्याचे तसेच जिल्हास्तरावर प्रशासकीय मान्यतेस विलंब होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने शासनाने यामध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार पाच कोटींपर्यंतच्या स्वतंत्र ग्रामीण पाणीपुरवठा योजना व प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे तांत्रिक मान्यतेचे अधिकारी कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले असून, पाच कोटींपर्यंतच्या योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे. शासनाच्या या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील ८८ पाणीपुरवठा योजनांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता पुरु षोत्तम ठाकूर यांनी दिली.