शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसाआड पाणीपुरवठा!

By admin | Updated: September 4, 2015 23:52 IST

फटका वीज भारनियमनाचा ; खामगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत.

खामगाव : गेल्या दहा-बारा दिवसांपासून भारनियमनामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. २७ ऑगस्टपासून शुक्रवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने पालिकेचे नियोजन कोलमडले असून, पूर्वी सात दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता चक्क दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्यावतीने शहराची पाच झोनमध्ये विभागणी केली आहे. या विभागणीनुसार शहरातील विविध वस्ती आणि कॉलन्यांना सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो; मात्र भारनियमनामुळे गेल्या काही दिवसांपासून पालिका प्रशासनाचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे शहरातील काही भागांना तहानलेलेच रहावे लागत आहे. नियोजित वेळेनुसार आणि अपेक्षेप्रमाणे पाणी मिळत नसल्यामुळे शहरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. शहरातील समतल तसेच टेकडीच्या परिसरातही पाणीपुरवठा होत नसल्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाल्याचे चित्र शहरातील सर्वच वस्त्यांमध्ये दिसून येत आहे. पाणीपुरवठय़ासाठी पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी तसेच अधिकार्‍यांकडे नागरिकांचा तक्रारींचा ओघ वाढला आहे; मात्र भारनियमनामुळे पालिका प्रशासनाला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात सातत्याने अपयश येत असल्यामुळे नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पालिकेत दिसून येत आहे. याबाबत नगरपरिषदेकडून वीज वितरण कंपनी कार्यालयाकडे वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत पाठपुरावा होत आहे.