शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

दुष्काळात फुटला पैनगंगा नदीपात्राला पाझर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 6:07 PM

बुलडाणा : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. मात्र या दुष्काळातही पैनगंगा नदीपात्राला पाझर फुटल्याचे चित्र बुलडाणा तालुक्यातील साखळी बु. परिसरात पाहावयास मिळाले आहे.

- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. मात्र या दुष्काळातही पैनगंगा नदीपात्राला पाझर फुटल्याचे चित्र बुलडाणा तालुक्यातील साखळी बु. परिसरात पाहावयास मिळाले आहे. नदी खोलीकरणामुळे भर उन्हाळ्याच्या दिवसात पाणी लागले आहे. परिणामस्वरूप परिसरातील हजारो गुरांची तहान या पाण्यावर भागविली जात आहे. बुलडाणा तालुक्यातील साखळी बु. शिवारातून गेलेली नदी समोर पैनगंगा या मुख्य नदीला मिळते. त्यामुळे साखळी बु. शिवारातील नदीला पैनगंगा नावानेच ओळखले जात. या नदी खोलिकरणाचे काम भारतीय जैन संघटना, मृद व जलसंधारण विभाग बुलडाणा आणि साखळी बु. ग्रामपंचायतच्यावतीने १४ डिसेंबर २०१८ पासून सुरू करण्यात आले आहे. भर उन्हाळ्याच्या दिवसात या नदीपात्रात पाणी लागले आहे. जलपूजनाने केला आनंदोत्सव साजरा कोरड्या पडलेल्या नदीपात्राला खोलीकरणामुळे पाणी लागताच साखळी बु. ग्रामस्थांनी व परिसरातील शेतकºयांनी जलपूजन करून आनंदोत्सव साजरा केला. सरपंच विजयाताई अनिल कोळसे यांच्याहस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या पुढाकाराने झालेल्या या कामामुळे काम मुक्या प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. परिसरात गुरांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. मात्र या पाण्यामुळे पशुपालकांना मोठा आधार झाला आहे. मुरूमाचा फायदा शेतरस्ते बनविण्यासाठी नदीपात्रातील मुरूमाचा फायदा झाला. साखळी खु. शिवारातील शेतरस्ते बनविण्यासाठी नदी खोलीकरणातून निघालेल्या मुरूमाचा वापर करण्यात आला. दीड कि़मी. सिंचन  शेतकºयांना शेतीतील सिंचनासाठी या नदीखोलीकरणाचा फायदा होणार आहे. जवळपास दीड कि़मी.पर्यंत शेतकºयांसाठी हे खोलीकरण सिंचनासाठी संजिवनी ठरणारे आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाriverनदीdroughtदुष्काळ