शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई कृती आराखडा

By admin | Updated: December 31, 2014 00:21 IST

खामगाव तालुक्यात पहिल्या टप्प्यात ५८ तर दुस-या टप्प्यात ४४ गावांचा कृतिआराखड्यात समावेश.

खामगाव (बुलडाणा) : येत्या उन्हाळ्यात उद्भवणार्‍या पाणीटंचाई निवारणार्थ खामगाव पंचायत समितीने उपाय योजना आखल्या असून, पंचायत समिती प्रशासन पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहे.खामगाव तालुक्यात ९६ ग्रामपंचायती असून, १४७ गावे आहेत. यापैकी १२ गावे उजाड आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन विविध उपाय योजना राबवित असतो. यावर्षी अत्यल्प पावसाळा झाल्याने सद्यस्थितीत पाणी पातळी खाली गेली आहे, त्यामुळे यंदाचा उन्हाळा चांगलाच आठवणार आहे. पाणीटंचाईसदृश गावांना तर चांगलेच चटके सहन करावे लागतील. येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्यावर तत्काळ उपाययोजना म्हणून पंचायत समिती प्रशासनाने ६ महिन्यांचा कृती आराखडा तयार केला आहे. माहे जानेवारी-मार्च २0१५ दरम्यान तालुक्यातील अंबिकापूर, अंत्रज, बोजरवळा, बेलखेड, बेलुरा, धापटी, ज्ञानगंगापूर, जयपूर लांडे, जनुना, हिवरखेड, खुटपुरी, हिवरा खुर्द, घाटपुरी, कंझारा, लांजुड, लासुरा जा., लाखनवाडा बु., लोणी गुरव, कोक्ता, माक्ता, मांडका, गेरु माटरगाव, नायदेवी, निरोउ, पिंप्राळा, पोरज, रोहणा, राहुड, शिरसगाव दे., शिराळा, झोडगा, नागझरी बु., नागझरी खु., ढोरपगाव, श्रीधर नगर या गावांमध्ये टंचाई निवारणार्थ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत.तर एप्रिल ते जून दरम्यान तालुक्यातील अडगाव, अटाळी, आवार, भंडारी, तरोडा नाथ, बोरी, दधम, गारडगाव, घाणेगाव, गोंधनापूर, जळका भडंग, जळका तेली, काळेगाव, कारेगाव बु., कोंटी, गेरु, लोखंडा, माक्ता, निमकवळा, पाळा, पळशी खुर्द, पिंप्राळा, पिंप्री गवळी, शहापूर, सुजातपूर, सुटाळा बु., सुटाळा खुर्द, वाडी, कुर्‍हा, वरणा व वझर, या गावांचा समावेश आहे.