बुलडाणा जिल्हावासीयांच्या अपेक्षांवर पाणी

By Admin | Updated: July 8, 2014 23:32 IST2014-07-08T23:32:12+5:302014-07-08T23:32:12+5:30

आज सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात बुलडाणा जिल्हावासींयांना मोठया अपेक्षा होत्या.

Water on the expectations of Buldhana district | बुलडाणा जिल्हावासीयांच्या अपेक्षांवर पाणी

बुलडाणा जिल्हावासीयांच्या अपेक्षांवर पाणी

बुलडाणा : आज सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात बुलडाणा जिल्हावासींयांना मोठया अपेक्षा होत्या. खामगाव- जालना रेल्वे मार्गाबाबत काही तरी घोषणा होईल, पुन्हा सर्व्हेक्षण केल्या जाईल या सर्व अपेक्षांवर पाणी फेरल्या गेले आहे. अर्थ संकल्प जाहिर झाल्यानंतर सोशल नेटवर्कीगवरही प्रतिक्रीया उमटल्या आहेत. जिल्ह्यासाठी कोणत्याही ठोस घोषणा नाही. खामगाव जालना या १५५.४ कि.मी. मार्गाऐवजी बर्‍हाणपूर-सोलापूर या ४५0 कि.मी. मार्गाची मागणीही समोर आली. असे झाले तर खामगाव-चिखली-जालना असा ६0 कि.मी.चा रेल्वेमार्ग तयार करण्याची गरज भासणार नव्हती. मात्र ही मागणीही रेल्वे मंत्रालयाने दूर्लक्षीत केली आहे.जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान ठरणारा अशा रेल्वे मार्गाबाबत सरकारची असलेली उदासिनता सर्वात मोठा अडसर ठरली आहे.

Web Title: Water on the expectations of Buldhana district