शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

मतदान सत्तरीच्या उंबरठय़ावर

By admin | Updated: October 16, 2014 00:51 IST

बुलडाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघांमध्ये मतदानाचा उत्साह, टक्केवारी वाढणार.

बुलडाणा : जिल्ह्यातील सातही मतदारसंघांमध्ये आज विधानसभेसाठी मतदानाची टक्केवारी अंतिम क्षणी ७0 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केला आहे.विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानासाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. मतदान सुरू झाल्यापासूनच केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. हा उत्साह दुपारपर्यंतही कायम राहिला व संध्याकाळी त्यामध्ये वाढ होत गेली. पाच वाजेपर्यंत सातही विधानसभा म तदारसंघांमध्ये ५३.५७ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. ही टक्केवारी अखेरीस ७0 टक्क्यांपर्यंत पोहोचली, असा अंदाज आहे. वाढलेल्या टक्केवारीमुळे सातही म तदारसंघांमध्ये प्रचंड चुरस निर्माण झालेली आहे. * बहिष्कार संपलाजिल्ह्यातील १७ गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. मात्र, बहिष्कार मागे घेत या सर्व गावांतील ग्रामस्थांनी मतदानात सहभाग नोंदविला. या गावांमध्ये प्रशासनाने संपर्क करून ग्रामस्थांची समजूत काढली.* केवळ सहा मतदारांनी केले मतदानचिखली तालुक्यातील बोराळा येथे १६६ मतदारांपैकी केवळ सहा मतदारांनीच मतदान केले. बोराळा गावातील समस्यांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. येथे विकासकामे होत नाही, अशी तक्रार मतदानात सहभागी न झालेल्या गावकर्‍यांची आहे.*उशिरापर्यंत मतदानमलकापूर मतदारसंघातील नांदुरा खुर्द येथे पाचनंतर मतदारांनी केंद्रांवर धाव घेतल्याने येथील मतदान उशिरापर्यंत सुरू होते. शेगाव तालुक्यातील मोरगाव डिग्रस येथील बहिष्कार दुपारी मागे घेण्याचा निर्णय झाला. त्यामुळे मतदान उशिरा सुरू झाले.* इव्हीएममध्ये बिघाडबुलडाणा मतदारसंघातील मोताळा तालुक्याच्या बोराखेडी येथे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचे एक बटण दाबले जात नव्हते. त्यामुळे सकाळी ८:२५ ला मतदान बंद करून ९:0५ वाजता पुन्हा मतदान सुरू करण्यात आले. सोनाळा येथेही एका इव्हीएममध्ये बिघाड झाला होता. खामगाव मतदारसंघातील वहाळा व शेगाव तालुक्यातील वरुड येथेही इव्हीएम काही काळ बंद पडले होते. मात्र, त्वरित दुरुस्त करण्यात आले.