शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

खामगावात दुचाकी आणि चारचाकीला बंदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 4:54 PM

दुचाकी आणि चारचाकी वाहनांना लॉकडाऊन काळात बंदी घालण्यात आल्याची माहिती शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर यांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलिस विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये अत्यावश्यक सुविधांची वाहतूक करणाºया परवानाधारक वाहनांना सोडून शहरातील सर्व दुचाकी आणि चारचाकी वाहनांना लॉकडाऊन काळात बंदी घालण्यात आल्याची माहिती शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर यांनी दिली आहे.    संपूर्ण जगात कोरोना या विषाणूजन्य आजाराने खळबळ माजविली आहे. त्याचप्रमाणे  देशात आणि राज्यात कोरोना संसर्गने मोठ्या प्रमाणावर पाय पसरले आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. देशात दिवसेंदिवस कोरोनाने बाधितांची संख्या वाढत आहे.  कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी शासनाकडून अनेक मोठी जिल्हे पूर्णत: बंद करण्यात आली आहे. याच अनुषंगाने पोलीस विभागानेही नियम कडक केले आहे.  १ एप्रिलपासून लॉकडाऊन काळात शहरात सर्व दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी ज्या वाहनांना पास दिली आहे. अशा वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी राहणार आहे. या व्यतिरिक्त जी वाहने शहरात फिरताना आढळून येतील त्यांचेवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. याचबरोबर नागरिकांनी भाजी, दूध, औषधे त्यांच्या परिसरातील दुकानांमधून पायी जाऊन आणावे असेही शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल अंबुलकर यांनी स्पष्ट केले आहे. शहरात नागरिकांची धरपकड!शहरात विनाकारण फिरणाºया नागरिकांची तसेच युवकांची पोलिस प्रशासनाकडून धरपकड करण्यात येत आहे. आतापर्यंत २१ जणांविरोधात भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे शहरात कुणीही विनाकारण फिरू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव