राहेरी बु.(जि. बुलडाणा), दि. २- येथील अल्पभूधारक शेतकरी विठ्ठल बाजीराव देशमुख यांची एक गाय व गोर्हा शेतात चारण्यासाठी राहेरीच्या माळरानाच्या शिवारात गेला होता. दरम्यान, दुपारी ३ ते ४ वाजताच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी वीज पडल्याने एक गाय व गोर्हय़ाचा मृत्यू झाला. त्यामुळे शेतकरी विठ्ठल देशमुख यांचे ३0 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तरी शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}