दोन अल्पवयीन मुली बेपत्ता; आई-वडिलांच्या तक्रारीनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल
By भगवान वानखेडे | Updated: September 13, 2022 16:28 IST2022-09-13T16:28:08+5:302022-09-13T16:28:36+5:30
याप्रकरणी त्या मुलींचा पोलीस शोध घेत आहेत.

दोन अल्पवयीन मुली बेपत्ता; आई-वडिलांच्या तक्रारीनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल
बुलढाणा : तालुक्यातील धामगाव बढे आणि रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गंत येणाऱ्या गावातील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. याप्रकरणी धामणगाव बढे पोलीस स्टेशनमध्ये मुलींच्या आईच्या तक्रारीवरुन तर रायपूर स्टेशनमध्ये वडिलांच्या तक्रारीवरुन १२ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्या मुलींचा पोलीस शोध घेत आहेत.
धामणगाव पोलीस स्टेशन अंतर्गंत येणाऱ्या एका गावातील तक्रारदार महिलेच्या तक्रारीनुसार, त्या आणि त्यांचे पती १० सप्टेंबर रोजी शेतात कामासाठी गेले असता घरी असलेली त्यांची १६ वर्षीय मुलगी दुपारी एक वाजेदरम्यान घरातून निघून गेली. दोन दिवस नातेवाईकांकडे शोध घेतला असता मिळून न आल्याने १२ सप्टेंबर रोजी धामणगाव बढे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. अल्पवयीन मुलीचे कोणी अज्ञाताने वाईट उद्देशाने अपहरण केल्याचा आरोपीही तक्रारदार महिलेने तक्रारीत केला आहे.
१४ वर्षीय मुलगीही बेपत्ता
तालुक्यातील रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गंत येणाऱ्या एका गावातील तक्रारदार वडिलांच्या तक्रारीनुसार, त्यांची १४ वर्षीय मुलगी ३ सप्टेंबरपासून बेपत्ता आहे. याप्रकरणी त्यांनी १२ सप्टेंबर रोजी रायपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, त्यांनीही तक्रारीत अपहरण झाल्याचे नमुद केले आहे. या दोन्ही प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहेत.