दोन गटात हाणामारी; १६ जणांवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: July 24, 2015 00:52 IST2015-07-24T00:52:45+5:302015-07-24T00:52:45+5:30

उंद्री येथील घटना; परस्पर दिलेल्या तक्रारीवरून १६ लोकांवर गुन्हा दाखल.

Two group clashes; 16 cases filed against them | दोन गटात हाणामारी; १६ जणांवर गुन्हा दाखल

दोन गटात हाणामारी; १६ जणांवर गुन्हा दाखल

अमडापूर (जि. अकोला): नजीकच्या उंद्री येथे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २३ जुलै रोजी सकाळी घडली. या प्रकरणी दोन्ही गटाने परस्पर दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी १६ लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. उंद्री येथील उत्तम संपत हजारे हे आपल्या किराणा दुकानामध्ये असताना सकाळी ७ वाजेच्या सुमारास अशोक नाना ओवाळकर, गणेश ओवाळकर, नारायण ओवाळकर, संतोष अशोक ओवाळकर, गोलू अशोक ओवाळकर, संदीप प्रकाश ओवाळकर, आशा अशोक ओवाळकर, सोनी ओवाळकर सर्व रा. उंद्री यांनी जुन्या कारणातून वाद घालून उत्तम हजारे, त्यांचा मुलगा गोपाल, भगवान, सून ज्योत्स्ना यांना लोखंडी सळाकीने मारहाण करून जखमी केले. अशी तक्रार उत्तम हजारे यांनी अमडापूर पोलिसांत दिली. तर आशा अशोक ओवाळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अंजना दुधाळे, गणेश दुधाळे, उत्तम हजारे, गोपाल हजारे, भगवान हजारे व इतर दोन महिला सर्व रा. उंद्री यांनी तुम्ही आमच्या नावाची तक्रार पोलिसाकडे का केली, म्हणून शिवीगाळ करून ओवाळकर कुटुंबीयांना मारहाण करून जखमी केले. या परस्पर दिलेल्या तक्रारीच्या आधारे अमडापूर पोलिसांनी सोळा लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Two group clashes; 16 cases filed against them