शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
7
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
8
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
9
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
10
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
11
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
12
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
13
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
14
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
15
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
16
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
17
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
18
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
19
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
20
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची मोटारसायकलला धडक; दोघे भाऊ जागीच ठार

By admin | Updated: May 15, 2014 00:11 IST

मुक्ताईनगरहून मलकापूरकडे येत असलेल्या मोटारसायकलीस ट्रकने दिलेल्या जबर धडकेत मोटारसायकलीवरील दोघे सख्खेभाऊ जागीच ठार झाले.

मलकापूर : मुक्ताईनगरहून मलकापूरकडे येत असलेल्या मोटारसायकलीस ट्रकने दिलेल्या जबर धडकेत मोटारसायकलीवरील दोघे सख्खेभाऊ जागीच ठार झाले. ही घटना आज १४ मे रोजी दुपारी २ वाजेदरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर चिखली रणधम वळण फाट्यावर घडली. मुक्ताईनगर जि.जळगाव खा. येथील वार्ड नं.५, सिटफार्म भागात राहणारे अकबरशाह दुल्लाशाह वय ३८ व रहेमनाशाह दुल्लाशाह वय ३६ हे मुलगी पाहण्यासाठी मुक्ताईनगरहून बुलडाणा येथे दुचाकी क्रमांक एमएच १९ बीआर १४७४ ने जात होते. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील रणथम (चिखली) वळणावर समोरुन भरधाव येणार्‍या ट्रक क्रमांक एमपी 0९ एचजी ७0५३ ने अकबरशाह दुल्लाशाह वय ३८ व रहेमनाशाह दुल्लाशाह वय ३६ हे जात असलेल्या दुचाकी क्रमांक एमएच १९ बीआर १४७४ ला जबर धडक दिली. धडक देवून ट्रक दोघांच्या अंगावरुन गेल्याने अकबरशाह दुल्लाशाह वय ३८ व रहेमनाशाह दुल्लाशाह वय ३६ या दोघा भावांच्या अक्षरशा चिंधड्या उडाल्या व दोघेही घटनास्थळीच ठार झाले. घटनेनंतर ट्रकचालक घटनास्थळावरुन फरार झाला. घटनेची माहिती मिळताबरोबर ग्रामीण पो.स्टे.चे पोलिस निरीक्षक सरनाईक, पोहेकॉ निंबोळकर, बोराडे, तळोले, ठाकूर, पोकॉ शिंदे आदींनी घटनास्थळी दाखल होवून उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी आणले. या अपघाताची फिर्याद मृतकाचा भाऊ इरफानशाह दुल्लाशाह रा. मुक्ताईनगर याने दिली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी ट्रकचालकाविरुध्द अप क्र.११/१४ कलम २७९, ३0४ अ, ३३७, ४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला.