ट्रॅक्टर चालकास ६ महिने कैदेची शिक्षा

By Admin | Updated: July 10, 2014 01:33 IST2014-07-09T23:45:16+5:302014-07-10T01:33:17+5:30

शेगाव : येथील न्यायालयाचा निकाल

Tractor driver for 6 months imprisonment | ट्रॅक्टर चालकास ६ महिने कैदेची शिक्षा

ट्रॅक्टर चालकास ६ महिने कैदेची शिक्षा

शेगाव : शेतीमधील मशागतीचे काम आटोपून परतताना ट्रॅक्टर चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालविल्याने अपघात होवून बाजुला बसलेल्या इसमाच्या मरणास कारणीभूत ठरलेल्या ट्रॅक्टर चालकाला ६ महिने कैदेची शिक्षा सोमवारी येथील न्यायालयाने ठोठावली.
याबाबत हकीकत अशी की, मनोजकुमार मरीभाऊ धुरंधर रा.आमसरी हा ३ डिसेंबर २00९ ला दुपारी रामेश्‍वर क्षीरसागर रा.अंबोडा ता. नांदुरा यांच्या शेतात मशागतीसाठी ट्रॅक्टर घेवून गेला होता. त्यानंतर परत येत असताना ट्रॅक्टर निष्काळजीपणाने चालवून ट्रॅक्टर पलटी केले. यामध्ये बाजुला बसलेले वसंत क्षीरसागर हे ट्रॅक्टरखाली दबल्याने ठार झाले. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक मालक मनोजकुमार धुरंदर याचेविरोधात कलम ३0४ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरण शेगाव येथील प्रथम वर्ग न्यायालयात दुसरे न्यायाधिश ए.एस. लांजेवार यांच्यासमोर सुनावणीसाठी आले असता एकुण ७ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये ट्रॅक्टर चालक मनोजकुमार मरीभाऊ धुरंधर हा दोषी आढळल्याने त्याला न्यायालयाने ६ महिन्याची साधी कैदेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारपक्षाच्यावतीने साहाय्यक सरकारी अभियोक्ता मंगेश मानकर यांनी काम पाहिले.

Web Title: Tractor driver for 6 months imprisonment