शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरने पोहोचविले सीलबंद मतदानयंत्र!

By admin | Updated: August 6, 2015 00:33 IST

नाल्याच्या पुरामुळे रात्रभर जागले कर्मचारी.

नांदुरा (बुलडाणा) : तालुक्यातील अलमपूर गावाजवळ असलेल्या नाल्याला आलेल्या पुरामुळे ४ ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्मचार्‍यांना नांदुरा तहसील गाठता आले नाही. त्यामुळे या चमुला रात्रभर मतदान केंद्रातच मुक्काम करावा लागला. मंगळवारच्या पहाटेपासून सर्वत्र संततधार पाऊस सुरू झाल्याने परिसरातील नदी- नाले दुथडी वाहून पूर आला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सोबतच पुरामुळे वाहतूक खोळंबल्याने याचा फटका मतदान केंद्रावर असलेल्या चमूला सुध्दा बसला. ४ ऑगस्ट रोजी तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. मतदानानंतर या चमूला निवडणूक साहित्य नांदुरा येथील तहसील कार्यालयात पोहोचवावे लागणार होते; मात्र अलमपूर नजीकच्या नाल्याला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली. तसेच नांदुर्‍याकडे येणार्‍या दुसरा पर्यायी रस्ता सुध्दा उपलब्ध नव्हता. त्यामुळे मतदान केंद्रावरील चमुंना मतदान केंद्रातच मुक्काम करावा लागला. अखेर ५ ऑगस्टच्या पहाटे ट्रॅक्टरच्या मदतीने मतदानाचे साहित्य व कर्मचारी यांना नाल्याच्या पुरातून सुखरुप पैलतिरावर पोहचविण्यात आले. अलमपूर ग्रामपंचायतच्या तीन वॉर्डासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशीन सील करेपर्यंत नाल्याला पूर आल्याने कर्मचारी रात्रभर अडकून पडले होते.