शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतरही डेथ सर्टिफिकेटच्या यातना संपेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST

बुलडाणा : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या मृत्यूच्या प्रमाणपत्रावर अनेक चुका होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मृतकाचे नाव, अडनाव किंवा ...

बुलडाणा : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या मृत्यूच्या प्रमाणपत्रावर अनेक चुका होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मृतकाचे नाव, अडनाव किंवा इतर माहिती चुकीची भरल्यामुळे नातेवाईक अडचणीत सापडत आहेत. मृत्यू प्रमाणपत्रावरील दुरूस्तीसाठी नातेवाईक कोविड सेंटरमध्ये गेल्यानंतर त्याठिकाणी दुरूस्ती करून दिली जात नाही. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही डेथ सर्टिफिकेटच्या यातना येथे संपत नसल्याचे चित्र आहे.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात कहर केला होता. दुसऱ्या लाटेने अनेकांना पोरके करून सोडले आहे. दोन महिन्यांपूर्वी कोविड सेंटरमध्येही जागा शिल्लक राहिली नव्हती. त्यामुळे कोरोना झाल्यानंतर नातेवाईकही घाबरलेल्या अवस्थेत रुग्णाला कोविड सेंटरमध्ये भरती करत होते. रुग्णाला भरती करत असताना त्याची माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. परंतु रुग्णांच्या नावात चुका झाल्याचे प्रकार आता समोर येत आहेत. रुग्णाच्या मृत्यूनंतरही त्याच्या प्रमाणपत्रावरील माहिती चुकीची झाल्याने प्रमाणपत्रावरील दुरूस्तीसाठी नातेवाईकांचा खटाटोप सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आता नातेवाईक आपल्या रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र घेऊन कोविड सेंटरमध्ये चूक दुरूस्तीसाठी जात आहेत. परंतु कोविड सेंटरमधील अधिकारी व कर्मचारी हे काम आमचे नाही, म्हणून त्या नातेवाईकांना परत पाठवतात. प्रमाणपत्रावरील या चुकांमुळे नातेवाईकांचा गोंधळ उडत आहे.

चूक कुणाची आणि हेलपाटे कुणाला?

नातेवाईक तर आपल्या रुग्णाचे नाव चुकीचे सांगू शकत नाहीत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला कोविड सेंटरमध्ये भरती करताना किंवा त्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यांचे नातेवाईक भांबावलेल्या परिस्थितीत असतात. अशावेळी कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी त्या रुग्णाची माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. मग या प्रकारामध्ये चूक कुणाची आणि हेलपाटे कुणाला? असा प्रश्न नातेवाईकांमधून उपस्थित होत आहे.

क्षयआरोग्य धाम कोविड सेंटरचा अजब कारभार

बुलडाणा येथील दोन कोविड सेंटरमध्ये मृत्यू प्रमाणपत्रावरील नाव चुकविल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचबरोबर इतर तालुक्यातूनही असे प्रकार समोर येत आहेत. परंतु बुलडाणा येथील क्षयआरोग्य धाम कोविड सेंटरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या मृत्यू प्रमाणपत्रावरील चूक दुरूस्त करण्यासाठी संबंधिताचे आधार कार्ड घेऊन गेल्यानंतरहीही दुरूस्ती होत नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून ॲफिडेव्हिटचा सल्ला

क्षय आरोग्य धाम येथील वैद्यकीय अधिकारी कुटुंबे यांना मृत्यू प्रमाणपत्रावरील नावात दुरूस्तीबाबत विचारणा केली असता, याठिकाणी ही दुरूस्ती होऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही दुरूस्ती कुठे कुठे करून देणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यासाठी ॲफिडेव्हिट (शपथ घेऊन लिहिलेले आणि पुरावा म्हणून वापरले जाणारे पत्र) चा सल्ला त्यांनी दिला.

आमच्या घरातील मोठा आधार गेला आहे. आता मला मत्यूचे प्रमाणपत्र शैक्षणिक कामासाठी आवश्यक आहे. परंतु त्यावर नावात चुका झालेल्या आहेत. त्या कोविड सेंटरमधून दुरूस्त करून मिळत नाहीत.

मृतकाचे नातेवाईक.

एकूण पॉझिटिव्ह : ८६९७०

मृत्यू : ६६३

उपचार घेत असलेले रुग्ण : १५६