आजची वारी पावसासाठीच!

By Admin | Updated: July 10, 2014 01:33 IST2014-07-09T23:39:41+5:302014-07-10T01:33:30+5:30

भिजव पांडुरंगा हे तहानलेले रान रे : वारकर्‍यांची मनोभावना

Today's rain is for rain! | आजची वारी पावसासाठीच!

आजची वारी पावसासाठीच!

फहीम देशमुख / शेगाव
रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले. आद्रार्ने आशा दाखविली. प्रतीक्षेत असणार्‍या शेतकर्‍यांनी आलेल्या एका पावसावर पेरणीला सुरुवात केली अन पुन्हा वरूण राजा रुसला. पेरणीचा कालावधी संपत आहे, मागील पाच वर्षांत पहिल्यांदाच पाऊस कमी पडला. वास्तविक पेरण्या आटोपून शेतकरी, वारकरी हे पायी वारी करतात. यंदा मात्र याउलट झाले. वारकरी यंदा पाउस नसल्याने बहुतांष पेरण्या झालेल्या नाही.जोरदार पाउस पडावा, पेरण्या व्हाव्यात आणि शेतकर्‍यासांठी सुगीचे दिवस यावे यासाठी विठु मावली पर्यंत न पोहचलेल्या भाविकांनी प्रति पंढरपुर मानल्या जाणार्‍या शेगावीच्या गजाननाला साकडे घालण्यासाठी संत नगरीत आज दाखल झाले.
आज शेगावात दाखल झालेल्या भाविकांशी चर्चा केली असता आज गजाननाशी पावसा शिवाय कुठलेही मागणे नाही.असे सर्वांनीच सांगीतले. पाऊस न पडल्याने पेरण्यांचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे बहुसंख्य वारकर्‍यांची यंदा वारी चुकली आहे. पंढरपुरच्या वारीसाठी अनेकांना ईच्छा असुनही भेटीसाठी जाता येत नाही. अशी भाविक मंडळी नेहमीच प्रति पंढरपुर असलेल्या शेगावात गजाननाच्या भेटीसाठी पोहचतात. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने अशाच लाखो भाविकांनी आज श्री चरणी माथा टेकवुन पावसा साठी आर्जव लागले.
२0 ते २५ जूनदरम्यान खरिपाची पेरणी व्हायला पाहिजे, त्याची आता जेमतेम सुरुवात झाली आहे. शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे.प्रत्येक वारकरी हा पावसाकडे आस लावुन बसलेला दिसुन आला.

Web Title: Today's rain is for rain!