शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
4
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
5
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
6
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
7
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
8
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
9
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
10
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
11
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
12
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
13
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
14
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
15
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
16
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
17
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
18
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
19
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
20
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
Daily Top 2Weekly Top 5

त्रासाला कंटाळून जाळून घेतले

By admin | Updated: February 14, 2015 01:44 IST

खामगाव तालुक्यातील घटना.

खामगाव (जि. बुलडाणा) : दारुड्या पतीकडून नेहमीच होत असलेल्या मारहाणीला कंटाळून ३७ वर्षीय विवाहितेने जाळून घेतल्याची घटना स्थानिक चांदमारी भागात काल रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी विवाहितेच्या बयानावरून शहर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक चांदमारी भागातील घरकुलमध्ये राहणार्‍या रेखा विनोद खरात (३७) रा. चांदमारी घरकुल या विवाहितेस तिचा पती विनोद खरात हा नेहमीच दारू पिऊन मारहाण करीत असे. या नेहमीच्या मारहाण व त्रासाला कंटाळून तिने काल रात्री अंगावर रॉकेल घेऊन पेटवून घेतले. तिने पेट घेतल्यानंतर आरडा-ओरडा केल्याने शेजारच्यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला व उपचारासाठी येथील सामान्य रुग्णालयात भरती केले. या घटनेत रेखा ही १00 टक्के जळाल्याने तिची प्रकृती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे तिला पुढील उपचारार्थ अकोला येथे पाठविण्यात आले आहे. तर रेखा खरात हिचा येथील कार्यकारी दंडाधिकारी यांनी बयान घेतले असता त्यामध्ये तिने पती विनोद याच्या त्रासाला कंटाळून जाळून घेतल्याचे सांगितले. यावरून शहर पोलिसांनी रेखा खरात यांच्यातर्फे पो.काँ. तुकाराम मोरे यांच्या फिर्यादीवरून विनोद खरात विरुद्ध अप.क्र.२७/१५ कलम ४९८ (अ) भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक फटिंग करीत आहेत.