शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

टिळकांच्या प्रेरणेने स्थापन झाले टिळक राष्ट्रीय विद्यालय

By admin | Updated: July 23, 2015 00:30 IST

टिळक राष्ट्रीय विद्यालयाच्या स्थापनेनिमित्त विद्यालयात विविध कार्यक्रम.

खामगाव : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या चार प्रमुख विद्यालयांपैकी खामगाव येथील टिळक राष्ट्रीय विद्यालय हे एक महत्त्वपूर्ण विद्यालय आहे. २३ जुलै रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आहे. या निमित्ताने टिळक राष्ट्रीय विद्यालयाच्या स्थापनेनिमित्त विद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढय़ात झालेल्या चळवळीचे प्रदीर्घ काळ केंद्र राहिलेले खामगाव येथील टिळक राष्ट्रीय विद्यालय हे शहराचे वैभव तर आहेच शिवाय स्वातंत्र्य चळवळीचे जिवंत स्मारकही आहे. महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे प्रभावित होऊन २४ जानेवारी १९२१ रोजी टिळक राष्ट्रीय विद्यालयाची स्थापना झाली. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व विदेशी वस्तूंवरील बहिष्कार या चतु:सूत्रीनुसार या विद्यालयाचा कारभार चालत होता आणि आज ९0 वर्षानंतरही विद्यालयाचे काम याच तत्त्वानुसार सुरू आहे. परकीय सत्तेच्या जुलमाने पेटून उठलेल्या कार्यकर्त्यांनी गांधीजींवरील असीम श्रद्धेने भारावलेल्या विचारातून या विद्यालयाची स्थापना केली. त्या काळात राष्ट्रीय विद्यालय म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचे एक केंद्र होते. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना बलशाली व निरोगी जीवन जगण्यासाठी शारीरिक कसरतीचे शिक्षण देणे येथे सुरू झाले. प्रखर राष्ट्रवाद हीच या संस्थेची ओळख झाली आहे.