शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीच्या मुदतवाढीसाठी कृषिमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या!

By admin | Updated: April 23, 2017 09:07 IST

जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत निर्णय; दारू दुकान परवाना प्रस्तावास ग्रामसभेत विरोध करा!

चिखली (जि. बुलडाणा) : शेतकरी बांधवांच्या संपूर्ण तुरीची खरेदी होईपर्यंत शासनाने नाफेडची खरेदी सुरू ठेवावी, यासाठी येत्या २६ एप्रिल रोजी काँग्रेसच्यावतीने राज्याचे कृषिमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्या निवासस्थानासमोर खामगाव येथे ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत दिली.जिल्हाध्यक्ष आ.बोंद्रे यांच्या अध्यक्षतेत काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची विस्तारित बैठक २२ एप्रिल रोज बुलडाणा येथील गांधी भवनात पार पडली. यावेळी आमदार हर्षवर्धन सपकाळ, श्याम उमाळकर, संजय राठोड, लक्ष्मणराव घुमरे, प्रकाश धुमाळ, अँड. जयङ्म्री शेळके, डॉ. इसरार जमदार, अँड. हरीश रावळ, रमेश घोलप, चित्रांगण खंडारे, बलदेवराव चोपडे, प्रकाश पाटील, मुख्त्यारसिंग राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत आ. बोंद्रेंनी शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठिय्या आंदोलनाबाबतची भूमिका स्पष्ट करून या आंदोलनात जिल्हय़ातील सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. १ मे रोजी होणार्‍या गावोगावच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घ्यावा. तसेच दारू दुकान सुरू करण्याच्या परवाना प्रस्तावास शहरी भागातील न.प.सदस्य व ग्रामीण भागातील जि.प., पं.स. व ग्रा.पं. सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवून कोणत्याही परिस्थितीत ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये, असे आवाहन केले. दरम्यान, परभणी महानगर पालिकेत काँग्रेस पक्षाने विजय संपादन केल्याबद्दल प्रांताध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण व पक्षनिरीक्षक श्याम उमाळकर यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. राजेंद्र वानखेडे यांनी यास अनुमोदन दिले. प्रास्ताविक व संचालन सतीश मेहेंद्र, तर आभार समाधान हेलोडे यांनी मानले. या बैठकीला जिल्हा काँग्रेस सर्व पदाधिकारी तसेच ब्लॉक शहर अध्यक्ष, फ्रंटल सेल अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.